घरावर झालेल्या गोळीबारानंतर सध्या बॉलीवूड अभिनेता सलमान खान चांगलाच चर्चेत आला आहे. रविवारी (१४ एप्रिल ) पहाटे पाच वाजताच्या सुमारास सलमानच्या घरावर दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी येऊन सलमानची भेट घेतली. तसेच त्याची भेट घेण्यासाठी काही राजकीय नेते सुद्धा भाईजानच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अशातच सोमवारी सायंकाळी गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान पहिल्यांदाच घराबाहेर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अभिनेता आलिशान गाडीतून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पडला. तसेच सलमानच्या गाडीच्या मागे-पुढे मुंबई पोलिसांचा ताफा पाहायला मिळाला. वरिंदर चावलाच्या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : हजारो कोटींचा मालक, तरीही सलमान खान १ BHK घरात का राहतो? भाईजानचं गॅलेक्सी अपार्टमेंटशी आहे खास नातं

सलमान घराबाहेर पडताना त्याच्याबरोबर निर्माते रमेश तौरानी सुद्धा उपस्थित होते. अभिनेत्याला पोलिसांच्या मोठ्या सुरक्षेखाली घराबाहेर नेण्यात आलं. आता भाईजान पुन्हा शूटिंग सेटवर केव्हा परतणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सगळ्या प्रकरणावर आता खान कुटुंबीयांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. सलमानचा भाऊ अरबाजने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोघांना गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात

“सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत. आमच्या सुरक्षेची त्यांच्याकडून पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल खूप आभार” असं अरबाजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसेच कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन अरबाजने सलमानच्या चाहत्यांना केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan steps out of bandra home a day after gunfire incident video viral sva 00