बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘बिग बॉस ओटीटी २’ शोमुळे चर्चेत आहे. १७ जूनपासून ‘बिग बॉस ओटीटी २’ला सुरुवात झाली. या रियालिटी शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. यंदाच्या बिग बॉस ओटीटी सिझनचा होस्ट सलमान खान आहे. दरम्यान सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानची अवस्था पाहून चाहते काळजीत पडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान खान नुकताच करण देओलच्या रिसेप्शन पार्टीत सहभागी झाला होता. या पार्टीतला त्या एक व्हिडीओ समोर आला आहे. ब्लॅक शर्ट, ब्लॅक बेल्ट आणि ब्लॅक कोट सूटसोबत ब्लॅक सूट परिधान केलेला सलमान खूपच सुंदर दिसत आहे. मात्र, या व्हिडिओतील सलमानचे डोळे आणि चेहरा पाहून अनेकजण अस्वस्थ झाले. अनेकांनी सलमानच्या सुजलेल्या डोळ्यांमागचं कारण विचारलं आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. हा चित्रपट २३ जून रोजी G5 वर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खान त्याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाचे शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.