बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एवढचं काय तर ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनादेखील उधाण आलं आहे. नुकतंच सिद्धार्थने ‘बिग बॉस’ हिंदी शोमध्ये हजेरी लावली.

सिद्धार्थ त्याच्या आगामी ‘थॅंक गॉड’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसह शोमध्ये सहभागी झाला होता. हा शो होस्ट करत असलेल्या सलमान खानने स्पर्धकांप्रमाणेच यावेळी सिद्धार्थचीही शाळा घेतली. सलमानने सिद्धार्थला “अभिनंदन सिद्धार्थ. शादी मुबारक रखो”, असं म्हणत चिडवायला सुरुवात केली. नंतर तो म्हणाला, “किती कियारा निर्णय तू घेतला आहे. म्हणजे प्यारा निर्णय. आणि कोणाच्या अडवाणीने…ओह सॉरी कोणाच्या अडव्हाइसने”.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा >> आलिया लग्नाआधीच गरोदर होती? बहीण शालीन भट्ट म्हणते…

हेही वाचा >> Video : तैमूर खानचा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले “ऑलिम्पिकमध्ये…”

“तुम्ही मला लग्नाबद्दल विचारत आहात”, असं मजेशीर उत्तर सिद्धार्थने सलमानला दिलं. त्यानंतर सलमानने कियाराचे टोपण नाव घेत पुन्हा सिद्धार्थला चिडवायला सुरुवात केली. “जानम, टिनू याला तुझ्याबरोबर लग्न नाही करायचं आहे. मी तिला लहानपणापासून ओळखतो”, असं तो म्हणाला. “जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तू सांगू नाही शकत ते कोणाबरोबर होईल. आणि त्यानंतरही किती लग्न होतील हेही सांगू शकत नाही”, असंही तो म्हणाला. यावर सिद्धार्थने “मला एकदाच लग्न करायचं आहे”, असं म्हणत स्पष्टीकरण दिलं.

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अनेक ठिकाणी सिद्धार्थ-कियाराला एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं आहे.

Story img Loader