२००३ मध्ये आलेला ‘तेरे नाम’ हा सिनेमा सलमान खानच्या करिअरमधील सर्वाधिक लोकप्रिय सिनेमांपैकी एक आहे. या चित्रपटातील सलमानच्या अभिनयामुळे हा सिनेमा आयकॉनिक ठरला. ‘तेरे नाम’ हा बॉलीवूडमधील आजवरच्या सर्वाधिक सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे सलमान खान खऱ्या अर्थाने बॉलीवूडचा सुपरस्टार झाला होता. या चित्रपटानं त्याकाळी तब्बल ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये ‘तेरे नाम’ या चित्रपटाला तब्बल २४ नामांकनं मिळाली असून, या चित्रपटाने सात पुरस्कार पटकावले होते. याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सलमान खानने एका अभिनेत्रीला धमकी दिली होती.

नुकत्याच एका मुलाखतीत छोट्या पडद्यावरील ‘कृष्णाबेहेन खाकरावाला’ फेम अभिनेत्रीने सलमान खानने त्यांना ‘तेरे नाम’च्या सेटवर एक दृश्य चित्रित करण्याआधी धमकी दिली होती अस सांगितलं आहे.

हेही वाचा…“ही कुठल्या अँगलने हिरोईन दिसते” असं म्हणत निर्मात्याने विद्या बालनचा केला होता अपमान, किस्सा सांगत म्हणाली, “सहा महिने…”

‘तेरे नाम’ सिनेमात सलमानसह सचिन खेडेकर, भूमिका चावला, रवि किशन आणि इंदिरा कृष्णन यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनाच सलमान खानने ‘तेरे नाम’च्या सेटवर धमकी दिली होती.

‘जॉईनफिल्म्स’ या यूट्यूब चॅनेलशी बोलताना इंदिरा कृष्णन म्हणाल्या, “एका सीनमध्ये मला सलमानला कानाखाली मारायची होती, पण सलमानने मला आधीच सांगितलं की, ‘थोडसंसुद्धा लागलं ना इंदिरा, तर बघ मी काय करतो. मी मोठा तमाशा करेन.’ हे ऐकल्यानंतर मला इतकं टेन्शन आलं की माझे हात थरथर कापत होते. नंतर सलमानने माझ्याबरोबर गंमत केली होती असं मला समजलं आणि माझा जीव भांड्यात पडला.”

हेही वाचा…धर्मेंद्र यांनी ‘या’ कारणामुळे दिला होता हेमा मालिनी यांच्याबरोबर काम करण्यास नकार, खुद्द ड्रीम गर्लनेच केला खुलासा…

याच मुलाखतीत इंदिरा म्हणाल्या, “सलमान एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आहे. त्याच्याबरोबर काम करताना मला खूपच मज्जा आली. सलमानबरोबर काम करताना तो सुपरस्टार आहे असं मला कधीच वाटलं नाही, तो खूप मजेशीर व्यक्ती आहे.”

२००३ साली प्रदर्शित झालेला ‘तेरे नाम’ सलमानच्या कारकिर्दीतील गाजलेला चित्रपट ठरला. या चित्रपटात सलमानने ‘राधे’ या प्रेमात वेडा झालेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही काळ आधी सलमान एका हिट-अँड-रन प्रकरणात अडकला होता. या काळात त्याचं ऐश्वर्या रायबरोबरचं नातंही संपुष्टात आलं होतं.

हेही वाचा…‘कहो ना…प्यार है’ चित्रपटासाठी अमिषा पटेलने परदेशातल्या नोकरीची सोडली संधी, शूटिंगच्या केवळ तीन दिवसाआधी…

‘तेरे नाम’मध्ये सलमानबरोबर काम केलेला अभिनेता रवि किशननेसुद्धा यापूर्वी एका मुलाखतीत सलमानच्या सेटवरील वागणुकीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला, “सलमान खूप मूडी होता. ‘राधे’ या पात्रामुळे त्याच्यावर प्रभाव पडला होता. सेटवर मी त्याच्यापासून अंतर राखून होतो.”

हेही वाचा…Video : अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ कृतीने दाक्षिणात्य पुरस्कार सोहळ्यात वेधले चाहत्यांचे लक्ष; व्हिडीओ व्हायरल

‘तेरे नाम’मधील सलमानच्या पात्राची तुलना काही प्रेक्षक ‘कबीर सिंग’शी करतात. सलमानच्या या पात्रावर तेव्हा टीका झाली असली तरी सलमानच्या या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.