Tiger 3 Box office collection Day 5: सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर ३’ रविवारी (१२ नोव्हेंबरला) प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. यानंतरसुद्धा दोन दिवस चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली, परंतु चौथ्या दिवसापासून याच्या कमाईत घसरण व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. सॅकनिल्क’च्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५७.५० कोटींचा गल्ला जमवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केवळ दोन दिवसांमध्येच चित्रपटाने १०२ कोटींचा आकडा गाठला होता. तिसऱ्या दिवशी ‘टायगर ३’ने ४२.५० कोटींचा गल्ला जमवला होता. परंतु चौथ्या दिवशी मात्र याच्या कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळाली. चौथ्या दिवशी ‘टायगर ३’ने केवळ २२ कोटींचा व्यवसाय केला. आता नुकतंच या चित्रपटाच्या पाचव्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत जे फारसे काही वेगळे नसल्याचं स्पष्ट होत आहे. सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने पाचव्या दिवशी केवळ १८.५ कोटींची कमाई केली आहे.

आणखी वाचा : ‘सरकार’मधील भूमिकेमुळे मिळाली खरी ओळख; मुलाखतीदरम्यान के के मेनन म्हणाले, “मी एक अभिनेता…”

या पाचही दिवसांच्या कमाईचे आकडे पाहता ‘टायगर ३’ने भारतात १९० कोटींची कमाई केली आहे तर या भारतात या चित्रपटाने केलेल्या ग्रॉस कलेक्शनचा आकडा २०० कोटींच्या पार गेला आहे. जगभरात या चित्रपटाने ४ दिवसांत २७१.५० कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. मीडिया रीपोर्टनुसार ‘टायगर ३’च्या हिंदी व्हर्जनमधूनच बरीचशी कमाई झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तमिळ व तेलुगू भाषांमधील चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘टायगर ३ʼने पहिल्या तीन दिवसांत या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जवान, पठाण आणि गदर २ या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. चौथ्या व पाचव्या दिवशी जरी चित्रपटाच्या कमाईत घट नोंदवण्यात आली, तरी आठवड्याच्या शेवटी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्यात हा चित्रपट ३०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खान, कतरिना कैफ, इम्रान हाशमी, रेवती, कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan tiger 3 box office collection day 5 avn