बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाने सलमान खानचा एक किस्सा सांगितला आहे. नमाशी चक्रवर्तीने सलमानची ‘राधे’ चित्रपटाच्या सेटवर भेट घेतली होती. त्या भेटीत सलमानच्या पाया पडल्यामुळे त्याने शिवी देत काही गोष्टी सुनावल्या, असा खुलासा नमाशीने केला आहे. पण सलमान जे काही बोलला ते सगळं मस्करीत होतं, असंही त्याने सांगितलं.

‘लेहरेन रेट्रो’ ला दिलेल्या मुलाखतीत नमाशी म्हणाला, “सलमान भाई ‘राधे’ चित्रपटाचं शूटिंग करत होते, मी ‘बॅड बॉय’ चं शूटिंग आटोपून मेहबूब स्टुडिओमध्ये त्यांना भेटायला गेलो होतो. मी जाऊन त्याच्या पाया पडलो आणि मी हे कॅमेऱ्यावर सांगतोय की ते मला ‘F**k off’ म्हणाले. मग त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, ‘मी तुझ्याच वयाचा आहे, त्यामुळे पुन्हा अशा फालतू गोष्टी करू नकोस. जर तू पुन्हा असं केलंस, खासकरून दिशा पाटनी समोर बसली असताना, तर मी तुला सेटवरून हाकलून देईन’. त्यामुळे सलमान खानच्या पाया पडायचं नाही, हा नियम लक्षात ठेवा.”

“…तर माझा भाऊ सुपरस्टार झाला असता”, अभिषेक बच्चनचं नाव घेत मिथुन चक्रवर्तींच्या मुलाचं वक्तव्य

मुलाखतीत नमाशीने गोविंदाबद्दल एक किस्सा सांगितला. “दरवर्षी २१ डिसेंबरला चिची भैय्याच्या (गोविंदा) वाढदिवसाला मी त्यांच्या घरी केक घेऊन जातो. आम्ही दोन-तीन तास एकत्र बसतो आणि गप्पा मारतो. तो नेहमी माझ्यासाठी स्वतःच्या हाताने चहा बनवतो. गप्पा मारताना मी त्यांचं कौतुक केलं की त्याला कंटाळा येतो,” असं नमाशी म्हणाला.

पाच वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणारा अभिनेता ठेवतोय रोजे, म्हणाला, “पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास…”

आपल्या वडिलांमुळे इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी आपल्याला करिअरमध्ये मदत केल्याचं नमाशी सांगतो. सलमान खान नेहमीच आम्हाला सल्ला देतो, त्याचबरोबर गोविंदा, सुनील शेट्टी, शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफही वेळोवेळी मदत करत असतात, असं नमाशीने सांगितलं.

Story img Loader