सिनेसृष्टीत करिअर करायचं, यश मिळवायचं अनेकांचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होतं, असं नाही. काहींना संधी मिळते, पण यश मिळत नाही. अशीच एक बॉलीवूड अभिनेत्री आहे, जिला वयाच्या १७ व्या वर्षी सलमान खानबरोबर चित्रपट करून पदार्पणाची संधी मिळाली. पण चित्रपट फ्लॉप ठरला आणि तिच्या करिअरला ब्रेक लागला. या अभिनेत्रीचे नाव आहे पूजा डडवाल. करिअरमध्ये अपयश आलंच, पण लग्नही यशस्वी झालं नाही, आता ही अभिनेत्री चाळीत राहत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ मध्ये पूजा डडवाल चर्चेत आली होती. तेव्हा तिच्याकडे एका जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठी पैसे नव्हते. ५ जानेवारी १९७७ रोजी जन्मलेली पूजा मुंबईचीच होती. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. तिला लहानपणापासूनच सिनेमाची आवड होती आणि मोठं झाल्यावर तिला अभिनय क्षेत्रात नाव कमवायचं होतं. त्यामुळे शालेय शिक्षणासोबतच तिने अभिनयाचे क्लासही जॉईन केले. यासंदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिलं आहे.

एके दिवशी अॅक्टिंग क्लास सुरू असताना पूजाला चित्रपटाची ऑफर आली. वयाच्या १७ व्या वर्षी तिला सलमान खानबरोबर ‘वीरगती’ चित्रपट करण्याची संधी मिळाली. १९९५ साली आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि पूजाच्या करिअरची सुरुवात चांगली झाली नाही. ‘वीरगती’ नंतर पूजाने आणखी काही चित्रपट केले, पण तिला हवं तितकं यश मिळालं नाही.

सलमान खानने अभिषेकला ऐश्वर्या रायपासून घटस्फोट न घेण्याचा दिला सल्ला? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “एक्स पार्टनरच्या…”

पूजा डडवालला चित्रपटांमध्ये चांगल्या ऑफर्स न मिळाल्याने तिने टीव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला. ती १९९९ मध्ये ‘आशिकी’ आणि २००१ मध्ये ‘घराना’ मध्ये दिसली होती. दोन हिट टीव्ही शो मिळाल्यानंतर तिला वाटलं की कदाचित आता तिला बॉलिवूडमधून चांगल्या ऑफर्स मिळतील, परंतु दुर्दैवाने असं घडलं नाही. त्यामुळे तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजाचे लग्न झाले आणि ती पतीसोबत गोव्याला शिफ्ट झाली. पूजाने तिच्या पतीचा गोव्यातील कॅसिनोही सांभाळला. २०१८ मध्ये पूजा आजारी पडू लागली. ती तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली असता तिला क्षयरोगाने ग्रासल्याचे आढळून आले. पूजाच्या प्रकृतीची माहिती पूजाच्या सासरच्या मंडळींना आणि तिच्या पतीला मिळताच त्यांनी तिच्यासोबतचं नातं संपवलं आणि तिला मुंबईत एकटीला सोडून दिलं.

मराठमोळ्या अभिनेत्याने गुजराती अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो आले समोर

एकवेळ अशी होती की पूजाच्या आयुष्यात काहीही उरलं नव्हतं. तिची प्रकृती चांगली नव्हती, तिच्याकडे काम, पैसा किंवा कुटुंबही नव्हतं. या काळात तिला तिचा हितचिंतक राजेंद्र सिंहचा पाठिंबा मिळाला. त्याने तिला तिला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. अतिशय सुंदर दिसणारी ही अभिनेत्री आता सापळा झाली होती. तिने कठीण प्रसंगी मदतीची मागणी केली होती. तिने यूट्यूबवर एका व्हिडीओच्या माध्यमातून सलमानकडे आर्थिक मदत मागितली. सलमानने लगेच मदतीचा हात पुढे केला आणि पुढील सहा महिन्यांचा तिच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला.

आई अन् आजी सुपरस्टार, अभिनेत्याबरोबरच्या एका MMS ने संपवलं ‘या’ अभिनेत्रीचं करिअर; आता काय करते? वाचा

पूजा थोडी बरी झाल्यावर ती मुंबईतील एका चाळीत आली आणि कुटुंबासमवेत राहू लागली. पूजाने २०२० मध्ये ‘शुक्राना: गुरु नानक देव जी’ या पंजाबी चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. हा चित्रपट चांगली कामगिरी करेल, असं तिला वाटलं होतं. पण चित्रपट फ्लॉप ठरला आणि पुन्हा एकदा पूजाला अपयश आलं. पूजा डडवालने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिचा मित्र आणि दिग्दर्शक राजेंद्र सिंहने तिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी टिफिनचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. या कामासाठी त्याने तिला जागा आणि लागणारे सामानही उपलब्ध करून दिले होते. आजही पूजा एका चाळीत राहते आणि तिथून टिफिन सेवा पुरवते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan veergati actress pooja dadwal career husband left after tb now lives in chawl hrc