अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहेत. गेले अनेक महिने त्याचे चाहते ‘टायगर ३’ची वाट पाहत आहेत. ‘टायगर ३’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. गेले अनेक महिने या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. पण अशातच आता या चित्रपटातील एक व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान घराच्या छतावर स्टंट करताना दिसत आहे.

हेही वाचा : “तुला लाज नाही वाटली?”, तमन्ना भाटियाचा बोल्ड सीनचा पाहून नेटकरी संतापले; म्हणाले…

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

‘टायगर ३’च्या निमित्ताने प्रेक्षकांना सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसेल, तर शाहरुख खान ‘टायगर ३’मध्ये कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

हेही वाचा : साडी नेसायला ३० मिनिटे, लुकसाठी ३ तास; ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणे नवाजुद्दिन सिद्दिकीसाठी नव्हते सोपे

‘टायगर ३’ च्या सेटवरून लीक झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान एका घराच्या छतावर शूट करताना दिसत आहे. सीन शूट केल्यानंतर सलमान खान त्याच्या टीमसह गच्चीवरून खाली उतरताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून भाईजानच्या चाहत्यांना ‘टायगर ३’ मध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन अनुभवण्यास मिळणार असे लक्षात येत आहे. शूटिंगदरम्यान सलमानने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. शूटिंग पूर्ण झाल्यावर सलमानने परिसरातील लोकांशी बातचीत केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, ‘टायगर ३’ मध्ये शाहरुख-सलमानच्या अ‍ॅक्शन सीनसाठी निर्माते विशेष तयारी करीत आहेत. यासाठी ‘टायगर ३’चे निर्माते तब्बल ३० कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे.

‘एक था टायगर’ २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर, ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या ‘टायगर’ सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘टायगर’ चित्रपट यशराज फिल्म्स ‘स्पाय युनिव्हर्स’चा सुद्धा एक भाग आहे. ‘टायगर ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Story img Loader