सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. मात्र, आता हळुहळू चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी बॉलीवूडच्या भाईजानने ‘टायगर ३’ चित्रपट आणि यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याबद्दल भाष्य केलं आहे.
विश्वचषक स्पर्धा सुरू असताना आणि दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टायगर ३’ प्रदर्शित करण्याचा चांगलाच फटका सलमान खानला बसला आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट लाँग वीकेंडला प्रदर्शित न करता दिवाळीला (१२ नोव्हेंबर रविवार )प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, चित्रपटाच्या कमाईत होणारी घट पाहता हा निर्णय चुकीचा ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील कार्यक्रमात सलमान खानने याविषयी भाष्य केलं आहे.
हेही वाचा : पुण्यातील नव्या हॉटेलनंतर ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री लवकरच सुरू करणार नवा व्यवसाय, खुलासा करत म्हणाली…
“आतापर्यंतचा प्रत्येक सामना भारतीय संघाने जिंकलेला आहे. याशिवाय हा वर्ल्डकप सुरू असताना आमच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतीय संघ नक्कीच जिंकेल आणि त्यानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळतील.” असं भाकित बॉलीवूडच्या भाईजानने केलं आहे.
हेही वाचा : सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल पुन्हा झालं बंद, अभिनेत्री कारण सांगत म्हणाली, “खवय्यांसाठी…”
दरम्यान, सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये सलमान खान-कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असून इम्रान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाशी तुलना केली असता पहिल्या तीन दिवसांच्या कमाईचे आकडे खूपच कमी आहेत. ‘जवान’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जगभरात एकूण ३८० कोटींहून अधिक कमाई केली होती.