Salman Khan Answer on Aishwarya Rai : बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला सलमान खान हा सध्या सिकंदर या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्याच्या बरोबर त्याची नायिका म्हणून रश्मिका मंदाना झळकणार आहे. या चर्चा होत असतानाच ऐश्वर्या रायविषयीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करण जोहरने ऐश्वर्याबाबत एक प्रश्न सलमानला विचारला. सलमानने दिलेलं उत्तर व्हायरल झालं आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या रायची केमिस्ट्री

‘हम दिल दे चुके सनम’ या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांचे सूर जुळले होते. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा झाली. तशीच त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचीही चांगलीच चर्चा झाली. दोघेही एकमेकांना तीन वर्षांहून अधिक काळ डेट करत होते. मात्र नंतर सलमान खानच्या वागणुकीला आणि त्याच्या वर्चस्वाला कंटाळून ऐश्वर्याने त्याची साथ सोडली. पुढे तिच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला होता. त्याने सलमान खानवर केलेले आरोप आणि त्यानंतर एका अवॉर्ड शोमध्ये कान पकडून मागितलेली माफी हे सगळ्यांनाच माहीत आहे. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. सलमानच्या आयुष्यात त्यानंतर कतरिना कैफ आली होती. मात्र कतरिना कैफनेही विकी कौशलची लग्न केलं आहे. कतरिनाचं लग्न होण्याआधी सलमान आणि कतरिना यांच्या अफेअरच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खान अजूनही बॅचलरच आहे. अशात सोशल मीडियावर त्याने ऐश्वर्या राय आणि कतरिनाबाबत दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.

Bollywood actors Aamir Khan Reaction To Being Called A 60 Year Old Goes Viral
Video: “६० वर्षांचा झालास”, असं म्हणताच आमिर खान झाला नाराज, पापाराझीला टोला लगावत म्हणाला…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
shahid kapoor at screen
Shahid Kapoor Live : ‘जब वी मेट’च्या गीत व आदित्यबद्दल शाहिद कपूरला काय वाटतं? पाहा मुलाखत
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…
Akshay Kumar dismisses Vivek Oberoi claim he went to bed when guests were having dinner
रात्री ९ वाजता झोपतो, अक्षय कुमारची कबुली; पाहुणे जेवत असताना निघून गेल्याच्या विवेक ओबेरॉयच्या वक्तव्याबद्दल म्हणाला…

हे पण वाचा- “तेव्हा माझं करिअर संपेल”, सलमान खानने ३४ वर्षांपूर्वी लिहिलेलं ‘ते’ पत्र व्हायरल; चाहत्यांना म्हणाला होता…

Salman And Aishwarya
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व सलमान खान या दोघांचे लव्ह हेट रिलेशनशिप जगजाहीर आहे.

सलमान खानचं उत्तर काय?

करण जोहर आणि सलमान खान यांचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ‘कॉफी विथ करण’ मध्ये सलमान खान आला होता त्यावेळचा आहे. या व्हिडीओत सलमान खानला करण जोहर विचारतो ऐश्वर्या की कतरिना कोण सर्वात सुंदर आहे? त्या प्रश्नावर सलमान खान आधी ऐश्वर्या रायचं नाव घेतो त्यानंतर कतरिना कैफला तो सुंदर म्हणतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हे पण वाचा- फोटो पाहिला, इटलीला गेला अन्…; ऐश्वर्या राय बरोबर ब्रेकअपनंतर विवेक ओबेरॉयने मंत्र्याच्या लेकीशी केलं लग्न; बायकोला पाहिलंत का?

सलमान खान ऐश्वर्याबद्दल काय म्हणाला होता?

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमाचे किस्से जगजाहीर आहेत. काही दिवसांपूर्वी सलमान खान असंही म्हणाला होता की, “या गोष्टीला आता खूप दिवस होऊन गेले आहेत. आता या गोष्टींना उजाळा देण्यात अर्थ नाही. ते दिवस विसरणं हे जास्त चांगलं. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ती व्यक्ती तुमच्यापासून वेगळी झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं. ती व्यक्ती दुसरीकडे आनंदी असेल तर तुम्हाला आनंद होतो. अभिषेक बच्चन चांगला व्यक्ती आहे.” असं सलमानने म्हटलं होतं.

Story img Loader