बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू असतानाच अजयने त्याच्या आणखीन एका आगामी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. अजयच्या ‘भोला’ या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

‘भोला’ चित्रपटाच्या टीझरनंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या नंतर अजय देवगण याचा पुढील भाग आणणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या भागात भाईजान अर्थात सलमान खान दिसणार आहे. अजय देवगण सलमान खान चांगले मित्र आहेत. याआधी ते ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. अजय त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता तर सलमान खान पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले ‘अशी कोणतीच बातमी खरी नाहीये, सलमान अजय देवगण फक्त मित्र आहेत. अजय देवगण सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे.’

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

वाढदिवसाच्या दिवशी कार्तिक आर्यन पोहचला सिद्धिविनायक मंदिरात; बाप्पाचे घेतलं दर्शन

अजय देवगण ‘दृश्यम २’ प्रमाणेच त्याच्या ‘भोला’ या चित्रपटसाठीही चर्चेत होता. हा चित्रपट त्याने स्वतः दिग्दर्शित केला आहे. यात त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री तब्बू काम करताना दिसणार आहे. यापूर्वी या दोघांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

‘भोला’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार कार्थी याच्या ‘कैथी’ (Kaithi) या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘कैथी’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. अजय देवगण उत्तम अभिनेता आहेच मात्र तो दिग्दर्शनाकडे वळला आहे. याआधी त्याने ‘शिवाय’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

Story img Loader