सूरज बडजात्या दिग्दर्शित २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रेम रत धन पायो या चित्रपटात सलमान खान आणि सोनम कपूर हे मुख्य भूमिकांत दिसले होते. मात्र, सुरुवातीला सलमान खान सोनम कपूरबरोबर काम करायला तयार नव्हता, असा खुलासा एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शकाने केला आहे.

‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सोनम कपूरला घेण्यास सलमान खानचा का होता नकार?

सूरज बडजात्या यांनी नुकतीच Zetcला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या कास्टिंग प्रोसेसबद्दल बोलताना म्हटले, “सुरुवातीला मी स्क्रिप्ट लिहिली आणि त्यानुसार कोणत्या नायिका ते पात्र उत्तम पद्धतीने साकारू शकतात, याबद्दल सलमान खानबरोबर बोललो. आमच्याकडे खूप नावे होती; पण मला नवीन चेहरा हवा होता. ‘रांझणा’ चित्रपटातील सोनमचे काम पाहिल्यानंतर असे वाटले ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी सोनम उत्तम आहे. आधी मला असं वाटलं नव्हतं, पण ती त्या भूमिकेसाठी योग्य होती.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

मी सोनमला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी घेण्यासाठी निर्णय घेतला आणि सलमान खानला तिचे फोटो दाखवले. त्याने त्या फोटोंकडे पाहिले आणि मला म्हटले, सूरज, मला विचार करू दे. एक महिना गेला तरीही तो विचारच करीत होता. सलमान खानने सोनमच्या वय आणि उंचीबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते, “ती खूप उंच आहे ना? आणि ती माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे. तिला मी मोठे होताना पाहिले आहे. चित्रपटात तिच्याबरोबर कसे रोमान्सचे सीन करू शकतो.” त्यावर मी त्याला आठवण करून देत म्हटले, “२००७ मध्ये सावरियाँ या चित्रपटात तुम्ही एकत्र काम केले आहे, असे म्हणत मी त्याला समजावले.”

सोनमच्या कास्टिंगसाठी होकार द्यायला सलमान खानने जवळजवळ पाच महिन्याचा वेळ घेतला.

सलमान खाननेदेखील 9XEला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, “या चित्रपटात सोनम कपूरची योग्य कास्टिंग होती. मी सुरुवातीला होकार देत नव्हतो; मात्र नंतर मला सूरजने समजावले होते.”

हेही वाचा: “ती माझी रील फ्रेंड आहे”, अमृता खानविलकरबद्दल असं का म्हणाला संकर्षण कऱ्हाडे?

याउलट सोनम कपूर सलमान खानबरोबर काम करण्यास उत्सुक होती. तिने एका मुलाखतीत बोलताना म्हटलेले, “मी सलमानचे सगळे चित्रपट पाहिले आहेत. मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होते. तो काही माझ्यासाठी अनोळखी नव्हता. मला सलमान खानबरोबर काम करायला खूप आवडले”, असे सोनमने म्हणताच सलमान खानने विनोद करीत म्हटले, “मी तिच्या वडिलांना चांगल्याच प्रकारे ओळखतो.”

दरम्यान, वयामध्ये १९ वर्षांचे अंतर असूनही चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. बॉक्स ऑफिसवर ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट हिट ठरला होता.

सूरज बडजात्या आणि सलमान खान यांनी एकत्र काम केलेला हा चौथा चित्रपट होता. याआधी त्यांनी मैने प्यार किया, हम आपके है कोन, हम साथ साथ है अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांत एकत्र काम केले होते.

Story img Loader