अमिताभ बच्चन, अनुपम खे, बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘उंचाई’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. राजश्री प्रोडक्शन या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटांच्या माध्यमातून दिग्दर्शक सुरज बडजात्या पुन्हा दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचदरम्यान ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजशी संवाद साधताना सुरज बडजात्या यांनी ‘मैने प्यार कीया’च्या दरम्यानच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटानंतर सलमान खान तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला. त्याच्याबरोबरच बडजात्या यांनी भाग्यश्रीलाही सुपरस्टार बनवलं. हा चित्रपट तेव्हाच्या काळातला मैलाचा दगड ठरला. यातील सगळीच गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. पण याच चित्रपटासाठी सर्वप्रथम सलमानला रिजेक्ट करण्यात आलं होतं.

आणखी वाचा : ‘आरआरआर २’ बद्दल दिग्दर्शक राजामौली यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “माझे वडील…”

त्याचबद्दल बडजात्या यांनी या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. ते म्हणाले, “२१ वर्षाचा असताना मी ‘मैने प्यार किया’ची कथा लिहायला घेतली. पहिलीच स्क्रिप्ट माझी नाकारण्यात आली आणि त्यानंतर मी तब्बल २ वर्षं याच्या कथेवर मेहनत घेतली. शिवाय आमच्या प्रोडक्शन हाऊसचे काही चित्रपट चालले नव्हते त्यामुळे तेव्हा कोणताच कलाकार आमच्याबरोबर काम करण्यास उत्सुक नव्हता. त्यानंतर आम्ही एका तरुणाला भेटलो ज्याला आम्ही पहिल्या स्क्रीन टेस्टनंतरच रिजेक्ट केलं होतं, पण तरी त्या तरूणात आम्हाला एक आत्मविश्वास दिसला आणि ५ महिन्यांनी आम्ही त्याला मुख्य भूमिकेसाठी निवडलं. त्या तरुणाचं नाव सलमान खान.”

सलमानला या चित्रपटाने सगळं दिलं. हा चित्रपट काढताना बडजात्या यांच्याकडे पैसे नव्हते याबद्दलही त्यांनी या मुलाखतीमध्ये खुलासा केला. त्यांनी पैसे उधारीवर घेऊन हा चित्रपट पूर्ण केला असं सुरज बडजात्या यांनी ‘उंचाई’च्या प्रमोशन दरम्यान स्पष्ट केलं. त्या चित्रपटानंतर बडजात्या यांच्या दोन्ही मोठ्या चित्रपटात सलमानच मुख्य भूमिकेत होता आणि ते दोनही चित्रपट चांगलेच गाजले. आजही कौटुंबिक मूल्यं जपणाऱ्या चित्रपट म्हंटलं की आपसूक राजश्री प्रोडक्शन आणि बडजात्या कुटुंबाचं नाव प्रेक्षकांच्या समोर येतं.