Salman Khan : अभिनेता सलमान खानने भगव्या रंगाचं एक घड्याळ परिधान करुन फोटो पोस्ट केले आहेत. या घड्याळावरुन मौलाना शहाबुद्दीन संतापले आहेत. मात्र या घड्याळाची चर्चा होते आहे. हे घड्याळ काय आहे? त्याची खासियत काय? आपण जाणून घेऊ.
सिकंदर चित्रपटामुळे सलमानची चर्चा
सिकंदर हा सलमान खानचा नवा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी म्हणजेच येत्या सोमवारी प्रदर्शित होतो आहे. सिकंदरच्या प्रमोशनमध्ये सलमान खान व्यग्र आहे. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान त्याने जे रामजन्मभूमीचं घड्याळ घालून फोटो पोस्ट केले आहेत त्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
रामजन्मभूमी असलेल्या घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती असलेलं रामजन्मभूमीचं घड्याळ जेकब अँड कंपनी एपिकने तयार केलं आहे. घड्याळ जेकब अँड कंपनी एपिक एक्स रामजन्मभूमी टायटॅनियम एडिशन 2 आहे. हे लिमिटेड एडिशन वॉच असून त्याची किंमत ३४ लाख रुपये आहे. सलमान खानने घातलेलं घड्याळ केवळ राम मंदिरामुळेच नाही तर त्याच्या किंमतीमुळेही चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या घड्याळाची किंमत ३४ लाख रुपये आहे. हे घड्याळ एपिक स्केलेटन मालिकेतील सर्वोत्तम आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेत्याने हातात भगवा रंगाचा पट्टा असलेले घड्याळ घातले आहे, ज्याचा डायल राम मंदिराच्या थीमवर बनवलेला आहे. या घड्याळाची किंमत ३४ लाख रुपये आहे असं सांगितलं जातं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
सलमान खानच्या घड्याळाची खासियत काय?
सलमान खानच्या घड्याळाचा बेल्ट भगव्या रंगाचा आहे.
सलमान खानच्या या खास घड्याळाच्या डायलवर रामजन्मभूमी कोरलेली आहे.
तसंच जय श्रीराम असंही लिहिलेलं आहे, प्रभू रामाचं चित्रही कोरलं आहे.
हनुमानाचं चित्रही कोरलं आहे
या सगळ्यामुळे या घड्याळाची डायल खूप सुंदर दिसते आहे.

सलमान खान ६१ लाखांच्या घड्याळामुळेही चर्चेत
सलमान खान त्याच्या लक्झरी घड्याळांमुळे कायमच चर्चेत येतो. सलमान खान आणि जेकब अँड कंपनीचे संस्थापक जेकब अराबो यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काही महिन्यांपूर्वी सलमान खानने ६१ लाख रुपयांचं घड्याळही घातलं होतं तेव्हाही त्याच्या घड्याळाची चर्चा झाली होती.अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचं स्टाईल स्टेटमेंट अनेकदा खासच असतं. त्याने विविध चित्रपटांसाठी केलेल्या हेअर स्टाईलही चर्चेचा विषय ठरला होता. आता सलमान खान राम मंदिर एडिशन स्पेशल वॉचमुळे चर्चेत आला आहे.