बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सलग ३ चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर ‘टायगर ३’मधून दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता सलमान लवकरच करण जोहरबरोबर ‘द बूल’ या चित्रपटावर काम करणार हे स्पष्ट झालं होतं परंतु तो चित्रपट काही कारणास्तव लांबणीवर पडल्याचा खुलासा करण जोहरने केला होता. आता आशातच सलमान खान १३ वर्षांपासून रखडलेल्या चित्रपटावर पुन्हा काम सुरू करणार अशी चर्चा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१२ साली सलमान खानने ‘शेर खान’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती. हा एक जंगल अडवेंचर चित्रपट असणार होता ज्यामध्ये भरपुर व्हीएफएक्सचा वापर केला जाणार होता. इतकंच नव्हे तर या चित्रपटात कपिल शर्मादेखील सलमानसह झळकणार होता. याचं दिग्दर्शन सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान करणार होता. परंतु काही कारणास्त हा चित्रपट लांबणीवर पडला.

आणखी वाचा : “मला पुन्हा…”, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर शाहरुख खानने व्यक्त केल्या मनातील भावना

आता तब्बल १३ वर्षांनी सोहेल खान या चित्रपटावर पुन्हा काम सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘न्यूज १८ शोशा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘शेर खान’ हा चित्रपट लांबणीवर का पडला याचं उत्तर खुद्द सोहेल खानने दिलं आहे. व्हीएफएक्समुळे या चित्रपटाला तयार व्हायला बराच काळ लागू शकतो अन् त्यादरम्यान तंत्रज्ञानात झालेले बदल आणि चित्रपटक्षेत्रातील प्रगती पाहता त्यांना हा चित्रपट फार जुना वाटू शकतो असे विचार सतत सोहेल खानच्या मनात येत होते अन् म्हणूनच हा चित्रपट इतकी वर्षं लांबणीवर पडला.

लवकरच सोहेल खान ‘शेर खान’वर काम सुरू करण्यास उत्सुक आहेत. २०२५ पर्यंत या चित्रपटावर काम सुरू होईल अशी माहिती खुद्द सोहेल खाननेच दिली. सलमानसध्या करण जोहरच्या ‘द बूल’ आणि कबीर खानबरोबरच्या एका चित्रपटावर काम करत आहेत. शिवाय स्पाय युनिव्हर्सच्या ‘टायगर विरुद्ध पठाण’मध्येही सलमान झळकणार आहे. अशातच आता ‘शेर खान’ची चर्चा होऊ लागल्याने २०२५ मध्ये सलमान नेमके कोणत्या चित्रपटात झळकणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल. सोहेल खानने याआधी ‘औजार’, ‘प्यार कीया तो डरना क्या’, ‘जय हो’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘शेर खान’मधून सोहेल खान नेमकं प्रेक्षकांना काय देणार आणि यात सलामनसह कपिल शर्माही काम करणार की नाही ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan will start working on sher khan directed by sohail khan avn