उद्योगपती मुकेश अंबानी यांचा थाकटा मुलगा अनंत अंबानीचा आज राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला. अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानी आज मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात देशातल्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूड कलाकारही या सोहळ्याला उपस्थित राहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: नीता अंबानींनी केलं धाकट्या सूनेचं स्वागत; नणंद इशाच्या बाळाला खेळवताना दिसली राधिका, पाहा साखरपुड्यातील खास क्षण

अनंत व राधिकाच्या एंगेजमेंट सेरेमनीला भाईजान सलमान खाननेही हजेरी लावली. सलमान निळ्या रंगाचा कुर्ता घालून या कार्यक्रमात पोहोचला. सलमानबरोबर त्याची भाची अॅलिझेह अग्निहोत्री देखील होती. तिने ऑफ व्हाइट रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

दरम्यान, अनंत व राधिकाच्या एंगेजमेंट सेरेमनीला अवघं बॉलिवूड उपस्थित होतं. रणबीर-दीपिका, अक्षय कुमार, शाहरुख खान व कुटुंब, वरुण धवन पत्नी नताशा दलालसह, तसेच सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan with sisters daughter alizeh agnihotri at anant ambani radhika merchant engagement function hrc