सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची घोषणेपासून चर्चा होती. इतकंच नव्हे तर यंदाच्या ‘फिल्मफेअर २०२३’ या सोहळ्याची सूत्रसंचालनाची जवाबदारी सलमान खानकडे सोपवण्यात आली आहे. नुकतंच सलमानने ‘फिल्मफेअर’च्या प्रेसमीट मध्ये हजेरी लावली.

यादरम्यान सलमानने पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला अन् सगळ्या प्रश्नांची त्याच्या खास शैलीत त्याने उत्तरं दिली. याच कार्यक्रमात सलमान खानला सध्याच्या तरुण अभिनेत्यांबरोबरच्या स्पर्धेबाबत आणि मानधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर सलमानचं उत्तर ऐकून लोकांना आश्चर्यच वाटलं. याचं उत्तर देताना त्याने त्याच्या काळातील सुपरस्टार्सची नावं घेत सांगितलं की “मी, शाहरुख, आमिर, अजय, अक्षय असे पाचही स्टार्स मिळून सध्याच्या अभिनेत्यांना त्यांच्या मानधनासाठी अधिक मेहनत घ्यायला लावू शकतो.”

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bollywood actors Aamir Khan Reaction To Being Called A 60 Year Old Goes Viral
Video: “६० वर्षांचा झालास”, असं म्हणताच आमिर खान झाला नाराज, पापाराझीला टोला लगावत म्हणाला…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Shahrukh Khan
“यावर्षी मी ६० वर्षांचा होईन, पण…”, शाहरुख खानचे वाढत्या वयाबाबत वक्तव्य; म्हणाला, “ज्या महिला…”
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…

आणखी वाचा : “कोण ए आर रेहमान?” अलका याग्निक यांनी ‘रोजा’मधील गाणी गाण्यास दिलेला नकार, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

या उत्तरातून सलमानने हे सूचित केलं की त्यांच्यापैकी कोणाचाही निवृत्ती घेण्याचा विचार नाही. याविषयी बोलताना सलमान म्हणाला, “आम्ही या तरुण कलाकारांना त्यांच्या कष्टाचा पैसा कामावण्यासाठी पळायला भाग पाडू. आम्ही इतक्यात निवृत्त नक्कीच होणार नाही. आमचे चित्रपट चालतायत त्यामुळे आम्ही आमचं मानधन वाढवलं आहे. हे पाहून या तरुण कलाकारांनीही त्यांचं मानधन वाढवून घेतलं आहे वास्तविक पाहता त्यांचे चित्रपट एवढे चालत नसूनही त्यांनी असं केलं आहे.”

आणखी वाचा : विवेक ओबेरॉयला लागलेत मराठी चित्रपटात काम करायचे वेध; म्हणाला “मी आणि रितेश देशमुख…”

याबरोबरच सलमानने नव्या दिग्दर्शकांचं कौतुकही केलं. सलमान म्हणाला, “मी आज जे बोललो आहे ते माझ्यावरच उलटायला नको अशी आशा करतो. माझा चित्रपट २१ एप्रिलला येणार आहे, तो सगळ्यांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.” सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये पूजा हेगडेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. भाईजानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader