बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची क्रेझ आजही तितकीच आहे. तब्बल ३ दशकं सलमान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. सलमान त्याचे चित्रपट, त्याची स्टाइल, त्याचे ट्रेंड, त्याची कामाची पद्धत यामुळे चर्चेत असतोच. त्याहून सलमानच्या कॉंट्रोवर्सी आणि लव्ह लाईफ या दोन गोष्टींची चर्चा आजही प्रचंड होते. सलमानचं काळवीट शिकार प्रकरण किंवा फुटपाथ अपघात प्रकरण याची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा त्याच्या अफेअर्सचीसुद्धा झाली.

वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर सलमानचं नाव जोडलं गेलं, बहुतेक सगळ्याच अभिनेत्रींना त्यांचा जोडीदार सापडला. पण या अभिनेत्रींना डेट करूनही सगळ्यांचा लाडका भाईजान अजूनही सिंगलच आहे. सलमान खानच्या अफेअर्सबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. नुकतंच सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने सलमानबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

Salman Khan And Shahrukh Khan
राकेश रोशन गाढ झोपेत असताना सलमान-शाहरूख खान त्यांच्या खोलीबाहेर गोळीबार…; दिग्दर्शक म्हणाले, “त्यांची सीमारेषा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
rape news kanpur
आधी मद्य पाजलं, मग मित्रांसमोर नाचायला भाग पाडत केला बलात्कार; IIT कानपूरच्या इंजिनिअर महिलेवर अत्याचार
Elli Avram
एक्स बॉयफ्रेंड अचानक परत आला, पोलिस ठाण्यामध्ये गेल्यावर म्हणाला…; ‘इलू इलू १९९८’ फेम एली अवराम म्हणाली…
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
Image Of Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack : “गरज पडली तर पोलीस…”, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली ही वयाच्या १५ व्या वर्षी सलमानला चित्रपटात बघताच त्याच्या प्रेमात पडली होती. १९९३ दरम्यान सोमी आणि सलमान हे दोघे रिलेशनशीपमध्येसुद्धा होते. नंतर काही कारणास्तव खटके उडायला सुरुवात झाल्यानंतर दोघे वेगळे झाले. यामागे सलमानची महिलांप्रती असलेली वर्तणूक हे कारण होतं. या काळात सलमानने सोमीला प्रचंड मारहाण केली, शारीरिक छळ केल्याचं समोर आलं. सोमीने याविषयी खुलासा फार नंतर केला.

नुकतंच सलमानबरोबरच्या नात्याबद्दल आणि त्याने केलेल्या शारीरिक शोषणाबद्दल सोमीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची बाजू मांडली आहे. वेगवेगळे बोल्ड आणि डिझायनर कपड्यांतील फोटोज शेअर करत सोमीने एकूणच या प्रकरणावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा : ‘स्कॅम १९९२’नंतर हंसल मेहतांची आगामी महात्मा गांधींवरील वेबसीरिज चर्चेत; प्रतीक गांधी साकारणार ‘ही’ भूमिका

सोमीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, “ही कोणत्याही प्रकारे ब्रेकिंग न्यूज नाही. १९९० ते १९९९ च्या काळातील कोणत्याही फिल्म मॅगझिनमध्ये तुम्हाला सलमानकडून सोमीचे शारीरिक शोषण झाल्याबद्दलचे लेख वाचायला मिळाले असतील. ९० च्या दशकात कधीच या गोष्टी प्रकाशात आल्या नाहीत असे प्रत्येकाला का वाटतं आहे हे मला खरोखरच गोंधळात टाकणारं आहे. मी फक्त त्याबद्दल भाष्य करणं बंद केले होते. पण आता यावर भाष्य करण्याचे या गोष्टीवर प्रकाश टाकायचे एक कारण आहे. सध्या हा कित्येक मुलं, स्त्रिया, पुरुष या अशाप्रकारच्या अन्यायाचा सामना करत आहेत, त्यांच्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यासाठी मी बोलायलाच हवं.”

इतकंच नव्हे तर नाव न घेताच सोमीने सलमानवर गंभीर आरोप लावले आहेत. तो सोमीला सिगरेटचे चटके द्यायचा, त्याने तिचे शारीरिक आणि लैंगिक शोषणदेखील केल्याचं सोमीने या पोस्टमध्ये कबूल केलं आहे. सलमानला महिलांनी डोक्यावर घेणं थांबवायला हवं असंही ती या पोस्टमधून म्हणाली आहे. सोमी अलीच्या या इन्स्टाग्राम पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अर्थात सलमानने अद्याप यावर काहीही भाष्य केलेलं नाही तसेच या आरोपांचं खंडनही केलेलं नाही.

Story img Loader