विकी कौशल हा असा बॉलिवूड अभिनेता आहे ज्याच्या अभिनयाचे चाहत्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सर्वांनी कौतुक केले आहे. प्रत्येक पात्रासाठी तो ज्याप्रकारे मेहनत घेतो व तो भूमिकेशी इतका समरस होतो की खरा विकी आणि ते पात्र यात फरक करणंसुद्धा बऱ्याचदा कठीण होतं. विकी लवकरच मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटात फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुक्ताचा झाला आहे ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
नुकतंच विकीने या चित्रपटासाठी केलेल्या तयारीचे काही फोटोज आणि व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. विकीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. विकी कौशलने फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिरेखेशी कसे जुळवून घेतले, याचा अंदाज आपण ट्रेलरवरून आणि विकीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओजवरुन लावूच शकतो.
आणखी वाचा : “त्याकाळी ३५०० रुपयांचा EMI…” नोकरी सोडल्यानंतरच्या स्ट्रगलबद्दल समीर चौघुलेंनी केलं प्रथमच भाष्य
विकीने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तो आगीच्या बरोबर वरून उडी मारताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो काटेरी कुंपणातून कसे बाहेर पडायचे याचे प्रशिक्षण लष्करी अधिकाऱ्यांबरोबर घेताना दिसत आहे. दुसर्या फोटोमध्ये, विकी कौशल अधिकाऱ्यांचे बारकाईने निरीक्षण करत आहे, सीमेवर कशी पोझिशन घेतली जाते याचा विकी सराव करताना दिसत आहे. तर दुसर्या फोटोत विकी आर्मी ऑफिसर्सशी संवाद साधताना दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करतानाच विक्की कौशलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी सांगू इच्छितो की, दिल्लीत ‘सॅम बहादूर’च्या ट्रेलर लॉन्चच्यादरम्यान, सहा शीख रेजिमेंटने माझे मोठ्या उत्साहात स्वागत केले. २०१८ मध्ये, मी उरीचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी मला अशाच ७ शीख रेजिमेंटने प्रशिक्षण दिले होते.” विकीच्या आगामी ‘सॅम बहादुर’मध्ये सान्या मल्होत्रा, फातीमा सना शेख, नीरज काबी, आशिष विद्यार्थीसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.