दाक्षिणात्य अभिनेता नागाचैतन्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नागाचैतन्य बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी नागाचैतन्यचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये शोभिता धुलिपालाही दिसत होती. त्यानंतर ते डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

शोभिता धुलिपालाचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला. तिने इकोनॉमिक्समध्ये पदुव्यत्तर पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. २०१६ मध्ये ‘रमन राघव २.०’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शोभिताने सैफ अली खानबरोबरही स्क्रीन शेअर केली आहे. शैफ या चित्रपटात ती झळकली होती. २०१८ साली तिने ‘टिक्का गुड्डाचारी’ चित्रपटातून तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

हेही वाचा>> नागाचैतन्याच्या डेटिंगच्या चर्चांवर समांथाने सोडलं मौन, म्हणाली “ज्या व्यक्तीला प्रेमाची किंमत…”

हेही वाचा>> परिणीता चोप्रा-राघव चड्ढा यांची लगीनघाई! दिल्लीत सुरू आहे साखरपुड्याची जय्यत तयारी

शोभिताने २०१३ साली मिस अर्थ स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं होतं. शोभिताला ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमुळे प्रसिद्धी मिळाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजमध्येही ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. नागाचैतन्यला डेट करण्याआधी शोभिता फॅशन डिझायनर प्रणव मिश्राला डेट करत होती. परंतु, काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं.

हेही वाचा>> Video: “हर हर शंभो” म्हणताच भारती सिंहच्या लेकाने काय केलं पाहा; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

नागाचैतन्यने २०१७ साली सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूबरोबर लग्न केलं होतं. परंतु, अवघ्या चारच वर्षांत त्यांचा संसार मोडला. २०२१ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. समांथाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर आता नागाचैतन्यचं नाव शोभिताबरोबर जोडलं जात आहे.

Story img Loader