अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. तिच्या मनातल्या गोष्टी ती नेहमीच व्यक्त करताना दिसते. आता विराट कोहलीबद्दल तिने केलेलं वक्तव्य खूप चर्चेत आलं आहे. विराट कोहलीचा रॉयल चँलेजर्स संघ आयपीएलच्या बाहेर पडला असला तरी विराटच्या खेळीने समांथा खूप प्रेरित झाली आहे.
‘स्टार स्पोर्ट्स इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिने विराटचं भरभरून कौतुक केलं. ती म्हणाली, “विराट कोहली हा माझ्यासाठी आदर्श आहे. तो नेहमीच इतर खेळाडूंनाही प्रेरणा देतो. मला त्याचं खूप कौतुक वाटतं. विराटचा दोन वर्षांपूर्वीचा काळ बघा, तो काळ त्याच्यासाठी फार खडतर होता. त्या वेळी तो ज्या संघर्षातून जात होता तो खूप वाईट होता. पण त्यावर मात करून त्याने स्वतःला सिद्ध केलं.”
पुढे ती म्हणाली, “जेव्हा जेव्हा त्याला अपयशाला सामोरं जावं लागलं तेव्हा तेव्हा त्याने पुन्हा त्याच वेगाने त्या अपयशावर मात केली. म्हणूनच त्याचा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मला त्यापासून बळ मिळालं आहे. विराटने पुनरागमन करत १०० धावा केल्या होत्या तेव्हा मी आनंदाने अक्षरशः रडले होते.”
हेही वाचा : समांथा रुथ प्रभूने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क
समांथा रूथ प्रभूचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. तिच्या या बोलण्याने विराटचे चाहते खूश झाले असून नेटकरी सोशल मीडियावरून विविध प्रतिक्रिया देत आहेत.