Sameer Wankhede on Aryan Khan drugs case : ऑक्टोबर २०२१ मध्ये ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. अटकेनंतर आर्यन खानने मुंबईतील तुरुंगात २५ दिवस घालवले होते. त्याला २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जामीन मंजूर होईपर्यंत चार वेळा जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर मे २०२२ मध्ये, त्याला सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आलं होतं. या प्रकरणामुळे शाहरुख आणि आर्यन यांच्याबरोबरच अधिकारी समीर वानखेडेही खूप चर्चेत राहिले होते. तेव्हा वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर होते.

आर्यन खानच्या अटक प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर आरोप झाले होते. आता एका मुलाखतीत त्यांना या प्रकरणाशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले, त्याची त्यांनी उत्तरं दिली. गौरव ठाकूरशी बोलताना फक्त सेलिब्रिटींनाच टार्गेट केल्याच्या टीकेवर समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया दिली. “माझा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात ‘सेलिब्रिटी’ या शब्दावर विश्वास नाही. मी फक्त ‘सो कॉल्ड सेलिब्रिटीज’ना पकडतो, असं लोकांना वाटतं; पण तसं नाही. इतरही ३४०० प्रकरणं मी हाताळली आहेत. पण ती लाइमलाइटमध्ये येत नाही, कारण ते लोक बातम्यांमध्ये झळकणारे नाहीत. मी फक्त माझे काम केले. लोक फक्त काही ठराविक लोकांबद्दलच लिहित असतील, तर त्यात माझी चूक नाही,” असं समीर वानखेडे म्हणाले.

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Muslims of Mumbra on streets to protect Hindus in Bangladesh
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यातील मुस्लीम रस्त्यावर
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Marathi actor Siddharth Jadhav answer to those who called Ranveer Singh of the poor
गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”
Yogi Adityanath on Bangladesh
Yogi Adityanath: “बाबरनं ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत जे केलं, तेच आज बांगलादेशात होतंय”, थेट DNA चा उल्लेख करत योगी आदित्यनाथांची टीका
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”

हेही वाचा – नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

मला भीती वाटत नाही – समीर वानखेडे

शाहरुख खान प्रकरणाबाबत बोलताना समीर म्हणाले, “हे प्रकरण माझ्या करिअरमधील सर्वात लहान प्रकरणांपैकी एक आहे. मला याला इतकं महत्त्व द्यायचं नाही तसेच त्याबद्दल बोलण्यात माझा वेळ वाया घालवायचा नाही. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे आणि मला त्यावर भाष्य करायचे नाही. मला एवढंच सांगायचं आहे की, मला कशाचीही भीती वाटत नाही आणि मी काहीही लपवत नाही. मी याबद्दल बोलणं टाळतो आणि त्यामागचं एकमेव कारण म्हणजे मी या खटल्याबद्दल बोलणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले आहे. बोलायला आणि शेअर करायला खूप काही आहे, पण मी बोलू शकत नाही. एकदा कोर्टाने निर्णय दिला की, मी त्याबद्दल सविस्तर बोलेन.”

हेही वाचा – वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधणारी मराठी अभिनेत्री झाली आई, लेकीचं नाव ठेवलं ‘अहना’; नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ चर्चेत

२०२१ मध्ये ही घटना घडली आणि २०२२ मध्ये आर्यन खानला या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. त्यानंतर शाहरुख खानने २०२३ मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यापैकी ‘जवान’चा एक डायलॉग खूप गाजला होता. हा डायलॉग समीर वानखेडेंसाठी शाहरुखने म्हटल्याची प्रचंड चर्चा झाली होती. ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ असा तो डायलॉग होता.

हेही वाचा – Photos: स्पीडबोटच्या धडकेनंतर बुडाली ‘नीलकमल’ बोट, समुद्रातील धक्कादायक फोटो आले समोर

अत्यंत हीन व थर्ड क्लास संवाद – समीर वानखेडे

शाहरुखच्या काही चॅट्स ऑनलाइन लीक झाल्याच्या बातम्याही तेव्हा आल्या होत्या. ज्यात तो कथितपणे आपल्या मुलाविरुद्धातील तक्रार रद्द करण्याची विनंती करत होता. यावर समीर उत्तर देत म्हणाले, “मला नावं घेऊन त्यांना जास्त प्रसिद्धी द्यायची नाही. लीक झालेल्या चॅट्सबद्दल बोलायचं झाल्यास मी स्वतः पुन्हा एकदा हेच म्हणेन की मला त्यावर बोलण्याची परवानगी नाही. बाप, बेटा असे शब्द वापरून जे डॉयलॉग माझ्याबद्दल म्हटले गेले ते अत्यंत हीन व थर्ड क्लास होते. सुसंस्कृत समाजात आपण असे शब्द वापरत नाही. हे फक्त रस्त्यावरचे फालतू डॉयलॉग आहेत. मी अशा गोष्टींना महत्त्व देऊन त्यावर बोलणं योग्य समजत नाही.”

Story img Loader