शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्याचा चित्रपट ओटीटीवरही सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटात शाहरुखचे पात्र विक्रम राठोरचा एक डायलॉग होता. एका सीनमध्ये तो ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ असा डायलॉग म्हणताना दिसला होता. हा डायलॉग शाहरुख खानच्या वैयक्तिक आयुष्यावर बेतलेला होता, अशी चर्चा ट्रेलरनंतर झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑक्टोबर २०२१ मध्ये ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. त्या घटनेशी संबंधित हा डायलॉग असून अधिकारी समीर वानखेडेंसाठीच हा डायलॉग किंग खानने म्हटल्याचं नेटकरी सोशल मीडियावर म्हणत होते. आता या डायलॉगवर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मुलाला हात लावण्याआधी…”, ‘जवान’मधील शाहरुख खानचा ‘तो’ डायलॉग ऐकून नेटकऱ्यांना आठवले समीर वानखेडे; म्हणाले…

‘जवान’ चित्रपटातील डायलॉग –

‘मेन्सएक्सपी’ शी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, “हा संवाद मला तरी हीन दर्जाचा वाटला. मी चित्रपट पाहत नाही आणि कोणतेच डायलॉग ऐकत नाही. मला या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही. पण हा डायलॉग बोलून जर कोणी मला लक्ष्य केलं असेल तर मी त्याला इंग्रजीत उत्तर देऊ इच्छितो.” समीर वानखेडे यांनी एका लेखकाचा डायलॉग म्हटला. “मी बरीच घरं आणि पूल जाळले आहेत आणि मी त्या जळलेल्या घरांवर आणि पुलांवर नाचलो आहे, त्यामुळे मला नरकाची भीती वाटत नाही म्हणून मला घाबरवू नका,” असं समीर वानखेडे म्हणाले. आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे, त्यामु मला कशाचीही भीती वाटत नाही, अशा आशयाचं विधान वानखेडेंनी केलंय.

आई अन् आजी सुपरस्टार, अभिनेत्याबरोबरच्या एका MMS ने संपवलं ‘या’ अभिनेत्रीचं करिअर; आता काय करते? वाचा

दरम्यान, समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. कारण हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण घडण्यापूर्वी शाहरुख खानशी झालेल्या भेटीबाबत समीर यांनी खुलासा केला. “मी या प्रकरणावर भाष्य करू शकत नाही. पण याआधी २-३ वेळा आम्ही भेटलो, त्या भेटी खूप व्यवस्थित होत्या. शाहरुख खान मला चांगलं ओळखतात आणि मीही त्यांना चांगलं ओळखतो,” असं समीर वानखेडे म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede reacts to shah rukh khan jawan dialogue calls it roadside hrc