शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘जवान’ चित्रपट पुढच्या आठवड्यात ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सुमारे साडेतीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये किंग खानचे अनेक संवाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. या ट्रेलरमधील अशाच एका डायलॉगची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या डायलॉगचं कनेक्शन नेटकरी थेट समीर वानखेडेंशी जोडत आहेत.

हेही वाचा : “तुम्ही असं बोलू शकत नाही”, तमन्ना भाटियाबद्दलचा ‘तो’ प्रश्न ऐकून विजय वर्मा संतापला, पापाराझींना दिलं स्पष्ट उत्तर

kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
kareena kapoor angry on paparazzi post
“हे सगळं थांबवा”, पती रुग्णालयात अन् मुलांबद्दलची ‘ती’ पोस्ट पाहून करीना कपूर खान संतापली; म्हणाली, “आम्हाला एकटं सोडा…”

‘जवान’च्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये शाहरुख खान ‘मुलाला हात लावण्याआधी बापाशी बोल’ असं म्हणताना दिसत आहे. यावर असंख्य नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या डायलॉगची स्वतंत्र १२ सेकंदाची क्लिप सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्सनी याचा संदर्भ थेट समीर वानखेडे यांच्याशी जोडला होता. याच पार्श्वभूमीवर आता स्वत: समीर वानखेडेंनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत शाहरुखचं नाव न घेता त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “माझ्या उडत्या केसांचं रहस्य…”, शिवाली परबच्या नव्या व्हिडीओने वेधलं लक्ष, पृथ्वीक प्रताप म्हणाला “तो…”

समीर वानखेडेंनी ट्विटरवर निकोल लायन्स यांचा कोट शेअर केला आहे. “आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केल्यामुळे मला जराही भीती वाटत नाही.” असा या कोटचा अन्वयार्थ आहे. ही पोस्ट वानखेडे यांनी शाहरुखच्या व्हायरल होणाऱ्या डायलॉगमुळे शेअर केली आहे असा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. समीर वानखेडेंनी ट्वीटमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यांनी केवळ कोट शेअर करत काही वृत्तवाहिन्यांना टॅग केलेलं आहे.

हेही वाचा : “हे लोणावळ्यात नेहमीच घडतं”, दुप्पट टोलमुळे मराठी कलाकार त्रस्त! आणखी एका अभिनेत्याने व्यक्त केला संताप

दरम्यान, समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी किंग खानच्या ‘जवान’ चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. याप्रकरणी आर्यन खान हा जवळपास महिनाभर तुरुंगात होता. पुढे आर्यनला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली होती.

Story img Loader