बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर २०१४ पासून ती मनोरंजन सृष्टीपासून लांब आहे. २०१५ मध्ये समीराने पहिल्या बाळाला जन्म दिला. यानंतर तिचे वजन प्रचंड वाढले होते. याविषयी अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

हेही वाचा : “स्वत:ची लायकी सोडून…”, पूजा सावंतने ट्रोलिंगबद्दल मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “त्या आक्षेपार्ह कमेंट्स…”

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

जेनिस सिक्वेराच्या युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत समीरा रेड्डीने प्रसूतीनंतर तिच्यात काय बदल झाले? लोक तिला काय म्हणायचे? याबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या पहिल्या गरोदरपणात मला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. माझं वजन प्रचंड वाढलं होतं. माझ्या घरी येणाऱ्या भाजीवाल्याने मला विचारलं दीदी तुम्हाला काय झालंय? हे ऐकून मी हैराण व्हायचे. आपल्या भारतीयांमध्ये एखाद्याला वैयक्तिक आयुष्याविषयी विचारण्याचे धाडस कुठून येते? याबद्दल मला आजवर कळालेले नाही.”

हेही वाचा : “‘ळ’ चा उच्चार करता येत नव्हता”, वैभव तत्त्ववादीने सांगितला जुना किस्सा; म्हणाला, “वरिष्ठ डोक्याला हात लावून…”

समीरा पुढे म्हणाली, “मला प्रसूतीनंतर पापाराझींची भीती वाटायची. पापराझी माझे फोटो काढतील म्हणून मी घराबाहेर सुद्धा पडायचे नाही. आता त्या गोष्टी आठवून समीरा तू स्वत:शी असे का वागलीस? असे म्हणायची वेळ येते कारण, आता मला कोणत्याच कमेंट्सचा फरक पडत नाही.”

हेही वाचा : ‘गदर २’ की ‘ओएमजी २’, कोणत्या चित्रपटाने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी? वाचा दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे

दरम्यान, समीरा रेड्डीने ‘रेस’, ‘डरना मना है’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘दे दना दन’, ‘आक्रोश’, ‘मुसाफिर’, ‘जय चिरंजीव’, ‘अशोक’, ‘वरणम आयाराम’ आणि ‘तेज’ अशा अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाहिले आहे. २०१४ मध्ये उद्योगपती अक्षय वर्देसह लग्न केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. तिने २०१५ मध्ये मुलगा हंस आणि २०१९ मध्ये मुलगी नायराला जन्म झाला. आता अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Story img Loader