बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने सिनेइंडस्ट्रीतील तिचे अनुभव सांगितले आहेत. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिच्या शरीरात बदल करण्यासाठी इंडस्ट्रीकडून आलेल्या दबावाबद्दल तिने भाष्य केलं. तिला अनेक प्रसंगी अनेक फिल्टर्स लावण्यास सांगितलं गेलं, पण या दबावाला न जुमानता आपण काम केलं असं समीराने नमूद केलं.

‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत समीरा म्हणाली, “माझ्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना मी सर्जरी करून माझे स्तन मोठे करून घ्यावे, यासाठी माझ्यावर किती दबाव टाकला गेला हे मी सांगू शकत नाही. बरेच लोक म्हणायचे, ‘समीरा, सगळे करत आहेत, मग तू का नाही?’ पण मला माझ्या आत असं काही नको होतं. हे आपले असे दोष लपवण्यासारखं झालं जे मुळात दोष नाहीच. ज्यांना प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्स करायचं आहे त्यांना मी नावं ठेवणार नाही, पण मी ते करणार नाही.”

कुजलेल्या अवस्थेत आढळला काजोलच्या को-स्टारचा मृतदेह, तीन दिवस वाट पाहूनही कुटुंबीय न आल्याने अभिनेत्रीवर पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

वय न लपवण्याबद्दल समीरा म्हणाली…

समीरा बऱ्याचदा आपलं वय जाहीरपणे सांगते आणि यासाठी चाहते तिचं कौतुकही करतात. गुगलने समीराचं वय चुकीचं दिलं होतं, पण तिने ते दुरुस्त करून घेतल्याचं सांगितलं. “लोक म्हणतात की मी आता अधिक आनंदी आणि अधिक कंफर्टेबल दिसत आहे. मी २८ वर्षांची असताना सुंदर दिसत होते, पण ४५ व्या वर्षी एक कंफर्ट आला आहे. मी ४० वर्षांची असताना इंटरनेट माझं वय ३८ वर्षे दाखवत होतं. पण मला ४० वर्षांची असल्याचा अभिमान होता म्हणून मी लगेचच ते बदलून घेतलं,” असं समीरा म्हणाली.

‘मुंज्या’ची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, ३० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने रविवारी कमावले तब्बल…

फिल्टर वापरण्याचा सल्ला

सुरुवातीला समीरा जेव्हा सोशल मीडियावर आली, तेव्हा तिला अनेकांनी फिल्टर वापरण्याचा सल्ला दिला होता. “मी म्हणाले की मी माझी त्वचा खराब असेल तर मी ती तशीच दाखवेन, मी माझं वाढलेलं वजन दाखवेन. कारण हीच मी आहे. ३६-२४-३६ या बॉडी साइजमध्ये फिट होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मी जे केलं, त्याबद्दल जास्त आनंदी आहे. मी खऱ्या आयुष्यात जशी आहे, तशीच मी सोशल मीडियावर वावरले. चित्रपटांमध्ये काम करताना मी हे कधीच करू शकले नव्हते.”

…म्हणून १२८ मिलियन व्ह्यूज असलेलं ‘बदो बदी’ गाणं युट्यूबने केलं डिलीट, पाकिस्तानी गायकाला कोसळलं रडू

समीरा पुढे म्हणाली, “माझ्या आणि माझ्या प्रेक्षकांमध्ये नेहमीच एक पडदा होता. लोकांना जे ऐकायचं आहे तेच फक्त आम्ही मांडतो, परंतु तुम्ही झोपेतून उठता तेव्हा सुंदर आणि खूपच नीट दिसता हे दाखवल्याने आपण असे का दिसत नाही हा विचार करून इतरांना टेन्शन येऊ शकतं. खरं तर तो फक्त दिखावा असतो. मी दररोज उठते तेव्हा फार चांगली दिसत असते असं नाही, मीही सकाळी उठल्यावर माझ्या मुलांच्या मागे धावत असते. ४५ वर्षांची झाल्यावरही माझ्याकडे चांगलं दिसण्याची क्षमता आहे. तुमचे पांढरे केस, तुमची पोटाची चरबी आणि तुमचे स्ट्रेच मार्क्स दाखवता तेव्हा तिथल्या कोणाला तरी ‘माझ्यासारखंही दुसरं कोणीतरी आहे’ असं वाटतं आणि यामुळे त्यांच्यावरील दबाव दूर होतो.”