नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्लुलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ हा रिॲलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री नीलम कोठारीदेखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. नीलमबरोबरच दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरदेखील सहभागी झाली आहे. नीतू कपूरदेखील त्यांच्या आयुष्यातील आठवणी सांगताना दिसून आल्या. आता नीलम कोठारीचा पती समीर सोनीने या शोमध्ये येण्यास, सहभागी होण्यास ती संकोच करत होती; कारण बराच काळ ती या शोपासून दूर होती असे म्हटले आहे.

समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा

समीर सोनीने नुकतीच जीप्लस या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी जेव्हा करण जोहरने नीलमला फॅब्लुलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज या शोसाठी विचारले होते, त्यावेळी तिची प्रतिक्रिया काय होती यावर वक्तव्य केले आहे. समीर सोनीने म्हटले, “तिने आता अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले तर लोक काय म्हणतील, याची तिला काळजी वाटत होती. कारण सहाजिक आहे, तुम्ही विशीत असताना वेगळे दिसता, त्यामुळे तिला असे वाटत होते की लोक म्हणतील ही आता वेगळी दिसते. ती खूप घाबरली होती.”

“मी तिला सांगितले की तू हा शो केला पाहिजेस, कारण लोक कमी काळासाठी गोष्टी लक्षात ठेवतात. माणसाची गोष्टी आठवणीत ठेवण्याची क्षमता कमी असते. जे लोक बघतील, ते स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी सतत काहीतरी शोधत असतात. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचे तर मी सुरुवातीला विचार केला होता की कोण असा शो बघेल; कारण मी स्वत:सुद्धा टीव्ही शो बघत नाही. मी या शोच्या पहिल्या सीझनला फार महत्त्व दिले नव्हते.”

एक आठवण सांगत समीर म्हणाला, “या शोआधी जेव्हा आम्ही बाहेर पडायचो, तेव्हा लोकांना माझ्याबरोबर फोटो काढायचे असत, त्यामुळे नीलमला अनेकदा फोटोग्राफर बनावे लागले होते. पण, हे चित्र या शोनंतर बदलले. मोठ्या प्रमाणात नीलमच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. लोक मला विचारू लागले, मॅम कशा आहेत. हा शो नेटफ्लिक्सच्याटॉप १० आंतरराष्ट्रीय शोपैकी एक आहे, त्यामुळे तिची लोकप्रियता वाढली आहे.”

हेही वाचा: २२ व्या मजल्यावर ३ BHK घर! दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता खानविलकरचं गृहस्वप्न साकार; दाखवली नव्या घराची पहिली झलक

दरम्यान, नीलम कोठारी याआधी १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम साथ साथ है’ या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होती. बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांत तिने काम केले आहे. फॅब्लुलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज या शोमध्ये नुकतेच नीलम कोठारीने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल तिच्या मुलीला कसे समजले आणि तिने त्याबद्दल प्रश्न विचारताच धक्का बसला होता, अशी आठवण सांगितल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader