बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी चर्चेचा विषय असते. कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती पती आदिल खानबरोबर असलेला वादमुळे चर्चेत आहे. हा वाद काही संपण्याच नाव घेत नाहीये. पण या वादादरम्यान राखी उमराह करण्यासाठी मक्का-मदीनाला पोहोचली. त्यानंतर भारतात अबाया परिधान करून फिरताना दिसली. मला ‘राखी’ नाही तर ‘फातिमा’ नावानं हाक मारा असं पापाराझींना सांगताना पाहायला मिळाली. पण तिच्या सर्व कृतीतून इस्लाम धर्माची खिल्ली उडवली जातेय, असं म्हटलं जात आहे. याविषयी सना खानला विचारलं असता ती काय म्हणाली पाहा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: अभिनेते अनुपम खेर यांनी एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाचं घेतलं दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिली खास भेटवस्तू

धर्मासाठी अभिनय क्षेत्र सोडून सध्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना सना खान दिसत आहे. पती अनस सैय्यदसह वैवाहिक जीवनात ती रमली आहे. नुकताच पतीबरोबर सनाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, राखी सावंतच्या कृतीतून इस्लाम धर्माची खिल्ली उडवली जातेय, असं लोक म्हणतं आहेत. याविषयी तुझं मत काय? असं विचारलं जात आहे.

हेही वाचा – “अंगावर गोष्टी काढू नका”, अमृता खानविलकरने स्त्रियांना दिला महत्त्वाचा सल्ला, स्वत:च्या मावशीचा अनुभव सांगत म्हणाली…

या प्रश्नावर सना खान म्हणते की, “प्लीज मला सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आणून नका. मी खरंच या गोष्टी बघत नाही.” त्यानंतर तिचा नवरा म्हणतो की, “हे सना खानचं काम नाहीये. तिला याबद्दल काहीच माहित नाहीये. ती आपल्या जगात आहे. तुम्हाला तिच्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा. पण जे काही घडतं आहे, ते एकत्र बसून सोडवलं पाहिजे.”

हेही वाचा – “तू इतका सेक्सी का आहेस?” चाहतीच्या प्रश्नावर अभिनेता गश्मीर महाजनीचं उत्तर, म्हणाला….

दरम्यान, लग्नाच्या दोन वर्षानंतर सना खान काही महिन्यांपूर्वी आई झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी तिनं चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे दिली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sana khan react on rakhi sawant islam controversy pps
Show comments