बऱ्याच हिंदी चित्रपटांसह ‘बिग बॉस’मध्ये झळकलेल्या सना खानने २०२०मध्ये धर्मासाठी इंडस्ट्रीला रामराम केला. सनाने इस्लाम धर्म स्वीकारून सूरतच्या व्यावसायिक मौलाना अनस सय्यदबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर सना आई झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. ५ जुलै २०२३ला सनाने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. तारिक जमील असं सना व अनसच्या मुलाचं नाव असून आज दोघांनी वर्षभरानंतर मुलाची पहिली झलक दाखवली आहे.

सना खान व अनस तारिक जमीलच्या जन्मापासून त्याचा चेहरा लपवत होते. सोशल मीडियावरही आपल्या लाडक्या लेकाचा व्हिडीओ शेअर करताना चेहरा लपवायचे. त्यामुळे सनाचे चाहते तारिक जमीलला पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. अखेर सनाने वर्षभरानंतर आपल्या मुलाचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. तिनं तारिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Fake IPS in Bihar Video viral
Bihar Teen Fake IPS: अंगावर वर्दी अन् कमरेला पिस्तूल, दोन लाख देऊन बनला IPS अधिकारी, पण ड्युटी जॉईन करणार इतक्यात…
amazon employee cut off
‘सायलेंट सॅकिंग’ म्हणजे काय? ॲमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी याचा वापर का करत आहे?
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
sarva karyeshu sarvada sane guruji rashtriy smarak trust information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : युवकांना घडवण्याचा उपक्रम, विस्तारासाठी मदत आवश्यक
pn gadgil jewellers ipo get huge response on day one
पीएनजी ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त पहिल्या दिवशी दोन पटीने भरणा

हेही वाचा – Video: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’, अमृता खानविलकरचा छोट्या पुष्पाबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

सनाने शेअर केलेल्या व्हिडीओतून, तारिक जमीलचा गोड अंदाज पाहायला मिळत आहे. चिमुकला तारिक मस्ती करताना दिसत आहे. तसंच वडिलांबरोबरचे त्याचे खास क्षण व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सनाने आज आपल्या लेकाचा गोड व्हिडीओ शेअर करत त्याचं इन्स्टाग्रामवर अकाउंट देखील सुरू केलं आहे.

हेही वाचा – Video: “अरमान मलिकला बाहेर काढा”, विशाल पांडेच्या आई-वडिलांनी भावुक होत ‘बिग बॉस’ला केली विनंती, म्हणाले…

तारिक जमीलच्या हा व्हिडीओ पाहून इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांसह सनाच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री युविका चौधरी, भारती सिंग, किश्वर राय अशा बऱ्याच कलाकारांनी सनाच्या मुलाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहे. तसंच तारिकच्या गोंडसपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या लग्नाआधी झाली ग्रह शांती पूजा; पारंपरिक लूकमध्ये दिसली अंबानींची होणारी सून

तारिक जमील नावाचा अर्थ काय?

दरम्यान, सना खानने ‘इ-टाइम्स’शी संवाद साधताना मुलाच्या नावामागचा अर्थ सांगितला होता. ती म्हणाली होती, “असं म्हणतात की नावाचा माणसावर खूप प्रभाव पडतो. त्यामुळेच आम्हाला पवित्रता, सौम्यता, काळजी आणि प्रामाणिकपणा दर्शवणारे नाव हवं होतं. जमील म्हणजे सौंदर्य आणि तारिक म्हणजे आनंददायी.”