Sanam Teri Kasam Actress Mawra Hocane Wedding : ‘सनम तेरी कसम’ या बॉलीवूड चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन लग्नबंधनात अडकली आहे. मागील अनेक दिवसांपासून मावराच्या अफेअरच्या व लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर तिने स्वतः फोटो पोस्ट करून लग्नाची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावराच्या पतीचं नाव अमीर गिलानी आहे. या जोडप्याने एका सुंदर सोहळ्यात ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न केलं. ३२ वर्षीय मावराने बुधवारी तिच्या निकाहचे रोमँटिक फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. मावराने या खास दिवसासाटी पेस्टल मिंट ब्लू टोनच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होती. तिच्या लेहेंग्यावर लाल व जांभळ्या रंगाची बॉर्डर डिझाईन होती. तिने मॅचिंग ब्लाऊज घातले होते आणि डोक्यावर ओढणी घेतली होती. तिने हिरव्या रंगाचे अगदी नाजूक दागिने घालून तिचा लूक पूर्ण केला होता. तर मावराचा पती अमीरने ऑलिव्ह हिरव्या रंगाचा पठाणी कुर्ता घातला होता.

मावरा व अमीर यांनी रोमँटिक पोज देत फोटो काढले. मावराने ‘and in the middle of chaos… I found you’, असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहे. मावरा व अमीरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा पोस्ट –

मावरा आणि अमीर यांनी यापूर्वी एकत्र काम केलं आहे. दोघेही ‘सबात’ आणि ‘नीम’ सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन ड्रामामध्ये एकत्र झळकले होते. त्यांनी कधीच त्याच्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण ते इव्हेंट्सना एकत्र हजेरी लावायचे, तसेच सोशल मीडियावरही एकमेकांबद्दल पोस्ट करायचे, त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर दोघांनीही लग्न करून या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

मावरा ही पाकिस्तानमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने हर्षवर्धन राणेबरोबर ‘सनम तेरी कसम’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. एकच चित्रपट केला असला तरी मावराचे भारतातही चाहते आहेत. तिचा हा गाजलेला ‘सनम तेरी कसम’ व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने ७ फेब्रुवारीला पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. २०१६ मध्ये आलेला हा चित्रपट ९ वर्षांनी चाहत्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.