Sanam Teri Kasam Box Office Collection Day 2: पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणेचा ‘सनम तेरी कसम’ चित्रपट २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती. पण, चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाच्या पुढे फ्लॉपची पाठी लागली. मात्र, नऊ वर्षांनंतर ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाला प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत पुनःप्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई ‘सनम तेरी कसम’ चित्रपट करताना दिसत आहे. एवढंच नाहीतर या चित्रपटाने स्वतःचे जुने रेकॉर्ड मोडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७ फेब्रुवारीला पुन्हा प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद चित्रपटाला मिळताना दिसत आहे. सध्या या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणे यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्यामुळे दोघं सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करून प्रेक्षकांचे आभार मानत आहेत.

७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाल्यानंतर ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.१४ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली. ६.२२ कोटींचा व्यवसाय ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केला. त्यामुळे या चित्रपटाने दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर ११.३६ कोटींचा गल्ला जमवला आहे. नऊ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मावरा आणि हर्षवर्धनच्या चित्रपटाने मोडला आहे. कारण २०१६मध्ये या चित्रपटाने फक्त ९.५० कोटींची कमाई केली होती, जी २०२५मध्ये दोन दिवसात केली आहे.

राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित ‘सनम तेरी कसम’ सध्या बॉक्स ऑफिसवर दोन नव्या चित्रपटाला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. जुनैद खान-खुशी कपूरच्या ‘लवयापा’ आणि हिमेश रेशमियाच्या ‘बॅडएस रविकुमार’ या दोन चित्रपटांपेक्षा ‘सनम तेरी कसम’ चित्रपट जबरदस्त कमाई करताना पाहायला मिळत आहे. मावरा आणि हर्षवर्धनचा या चित्रपटाचं बजेट २५ कोटी रुपये आहे. या चित्रपटात मावरा, हर्षवर्धन व्यतिरिक्त अनुराग सिन्हा, मनष चौधरी, मुरली शर्मा आणि सुदेशी बेरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.