रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.

चित्रपटाचं जेवढं कौतुक झालं त्याहून कित्येकपटीने याचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीकाही झाली. विषारी पुरुषत्व, हिंसाचार, नग्न दृश्य अशा बऱ्याच गोष्टींचा ‘अ‍ॅनिमल’मध्ये भडिमार असल्याने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीका झाली. चित्रपटसृष्टीतीलही बऱ्याच लोकांनी ‘अ‍ॅनिमल’वर टीका केली. आता आमिर खानची दुसरी पूर्वपत्नी किरण रावनेदेखील संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटावर टीका केल्याचं स्पष्ट झालं आहे.

Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

आणखी वाचा : पूनम पांडे होती कोट्यवधींची मालकीण; अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान खुद्द संदीप रेड्डी वांगा यांनीच याबद्दल खुलासा केला. संदीप म्हणाले, “काही लोकांना ते काय बोलतायत हेच कळत नाही. एका असिस्टंटने मला एका सुपरस्टारच्या दुसऱ्या पूर्वपत्नीने लिहिलेला एक लेख दाखवला ज्यात ती म्हणते ‘बाहुबली’ व ‘कबीर सिंग’सारखे चित्रपट पुरुषी अहंकाराचे किंवा पाठलाग करण्याची उदात्तीकरण करतात. कदाचित तिला पाठलाग व विचारणे यामधील फरक कळत नसावा.”

यानंतर पुढे आमिर खानच्या चित्रपटाचा उल्लेख करत संदीप म्हणाले, “मला त्या महिलेला सांगावेसे वाटते की तिने आमिर खानला जाऊन ‘खंबे जैसी खडी है’ या गाण्याचा अर्थ विचारावा मग माझ्याकडे ही तक्रार घेऊन यावं. तुम्हाला आठवत असेल तर ‘दिल’ चित्रपटात आमिर खानने तर एका प्रसंगात बालात्काराचा प्रयत्न केला आहे. आमिर व माधुरी दीक्षित प्रेमात पडण्याआधीचा सीन आठवा. मला एक गोष्ट समजत नाहीत दुसऱ्यावर टीका करताना ही लोक आपल्या आसपास काय आहे त्याचा विचार का करत नाहीत?”

आणखी वाचा : अभिनयाला रामराम अन् राजकारण फूलटाइम; थलपती विजयने केली स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना

दिल चित्रपटाच्या एका प्रसंगात माधुरी दीक्षितचं पात्र आमिर खानच्या पात्रावर बलात्काराचा आरोप लावते. त्यानंतर आमिर खानचं माधुरीच्या पात्राला बलात्कार या शब्दामागचं गांभीर्य समजावून सांगण्यासाठी खरोखर तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करतो, पण तो पुढे काही करत नाही. त्याकाळी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हादेखील या सीनवर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला होता. संदीप रेड्डी वांगा यांनी याच गोष्टीची आठवण करून देत किरण राववर तोंडसुख घेतलं आहे.