रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ‘अॅनिमल’ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक दक्षिणेतील दिग्गज दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. ‘अॅनिमल’च्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत संदीपने ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ बनवताना आलेल्या अडचणीचा खुलासा केला. तसेच आपण यानंतर कधीच कोणत्याच चित्रपटाचे रिमेक बनवणार नाही, असंही त्याने नमूद केलं. ‘कबीर सिंग’मध्ये शाहिद कपूरला मुख्य भूमिकेत घेण्याच्या विरोधात सगळे जण होते, असा खुलासाही त्याने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कबीर सिंग’ हा मूळचा तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक होता. यात विजय देवरकोंडाने मुख्य भूमिका केली होती. अवघ्या तीन कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ५० कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘आय ड्रीम’ला दिलेल्या मुलाखतीत संदीपने सांगितलं की हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्यानंतर, त्याने महेश बाबूसमोर एका चित्रपटाची कल्पना मांडली. पण महेश बाबूने दुसरा प्रोजेक्ट साइन केला. त्यानंतर आपण ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदीमध्ये रिमेक करण्याचा निर्णय घेतला. कारण मला बॉलीवूडमधून भरपूर ऑफर्स आल्या होत्या.

“मीही व्हर्जिन नाही”, जेव्हा नेहा पेंडसेने ट्रोलर्सना दिलेलं सडेतोड उत्तर; दोन मुलींच्या वडिलाशी लग्न केल्याने झालेली ट्रोल

संदीप म्हणाला, “इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहिल्या गेलेल्या चित्रपटाचा रिमेक करणं सोपं काम नाही आणि ते त्रासदायक ठरू शकतं. मला रिमेक करण्यासाठी मुंबईतून सतत फोन येत होते. सर्वात आधी यासाठी रणवीर सिंहशी संपर्क साधण्यात आला, कारण मला हा चित्रपट त्याच्यासोबत करायचा होता. पण रणवीरने नकार दिला. त्याच्यामते हे पात्र त्याच्यासाठी खूप डार्क होतं. त्यानंतर हा रिमेक बनवायचा नाही असं ठरवून मी दुसऱ्या तेलुगू चित्रपटावर काम करू लागलो.”

रिमेक चालला नसता तर ही दिग्दर्शक म्हणून आपल्यासाठी खूप लाजिरवाणी बाब असती, असं संदीपने सांगितलं. “इंडस्ट्रीतील सर्व निर्माते व वितरकांनी हा चित्रपट पाहिला होता. रणवीरच्या नकारानंतर शाहिदशी संपर्क साधण्यात आला. पण लोकांना ते पटलं नाही. कारण शाहिदचा ट्रॅक रेकॉर्ड चिंतेचा विषय होता, तेव्हा त्याच्या एकाही चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली नव्हती, त्याची सर्वाधिक कमाई ६५ कोटी रुपये होती. ते म्हणायचे की ५५ व ६५ कोटी रुपयांचा व्यवसाय तेलुगू चित्रपट करतात. ‘तू याला चित्रपटात का घेतोय? जर रणवीर असता तर बॉक्स ऑफिस कलेक्शन जास्त असते, असं लोकांनी म्हटलं. पण शाहिदबद्दल मला खात्री होती की तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे,” असं संदीप म्हणाला.

“मी त्याला दिलीप नावाने…”, सुरेश वाडकरांचे एआर रहमान यांच्याबद्दल विधान, ‘त्या’ वादानंतर दोघांनी कधीच एकत्र केलं नाही काम

‘कबीर सिंग’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ३६ कोटी रुपये खर्च आला होता आणि त्याने जगभरात ३८० कोटी रुपये कमावले होते, असं संदीप रेड्डी वांगाने सांगितलं. यावेळी त्याने ‘अॅनिमल’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल अंदाज बांधले. त्याच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट पहिल्या दिवशी ५० कोटींहून अधिक कमाई करेल आणि सुरुवातीच्या तीन दिवसांत तो जगभरात ३०० कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep reddy vanga reveals ranveer singh rejected kabir singh was warned against casting shahid kapoor hrc
Show comments