अभिनेत्री संदीपा धर काश्मीरला गेली आहे. तिने बुधवारी एक व्हिडीओ शेअर करत श्रीनगरमधील तिच्या घराची झलक दाखवली. ३० वर्षांपूर्वी एका रात्रीत तिच्या कुटुंबाला हे घर सोडायला भाग पाडण्यात आलं होतं. संदीपाचा जन्म श्रीनगरमध्ये एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला होता. तिने ३० वर्षांनी पहिल्यांदाच त्या घराला भेट दिली आणि यावेळी ती भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
संदीपाने व्हिडीओमध्ये घर, अंगण आणि सफरचंदाची झाडं दाखवली. झाडावरून एक सफरचंद तोडून तिने खाल्लं. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, “३० वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबाला श्रीनगरमधून एका रात्रीत पळून जाण्यास भाग पाडलं गेलं. आम्ही एका सूटकेसमध्ये जेवढं सामान मावलं, तेवढं भरलं आणि पळून गेलो. आणि आता, ३० वर्षांनंतर आम्ही आमच्या त्या घरी परतलो. उरलं ते रिकामं उभं घर आणि उरल्या त्या आठवणी ज्या आम्ही जवळपास ३ दशकांपूर्वी बनवल्या होत्या. यावेळी आम्हाला पळून जावं लागणार नाही. आशा आहे की कधीच जावं लागणार नाही!”
३० वर्षांपूर्वी काश्मिरी पडितांना राहती घरं सोडून जीव वाचवत पळून जावं लागलं होतं. त्यात संदीपाचे कुटुंबही होते. संदीपाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘तू नशीबवान आहेस की तुम्ही ज्या स्थितीत तुमचं घर सोडलं होतं, ते त्याच स्थितीत आहे. पण बरेच लोक इतके भाग्यवान नाहीत,’ ‘प्रत्येक काश्मिरी पंडित एक दिवस त्यांच्या घरी परतेल त्या दिवसासाठी मी प्रार्थना करतो,’ असं एका युजरने म्हटलं आहे.