बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या लग्नाच्या चर्चांना अधून मधून होत असतात. ५७व्या वर्षीही अविवाहित असलेल्या सलमानच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी भाईजानचे प्रेमसंबंध होते. मिस युनिव्हर्सचा किताब नावावर केलेल्या संगीता बिजलानीबरोबरही सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता.

सलमान खानने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सलमान काळ्या रंगाचं टी-शर्टमध्ये छान स्माईल देताना दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून संगीता बिजलानीला कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. सलमानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या संगीताने त्याच्या फोटोवर “हे” अशी कमेंट केली आहे. सलमानच्या फोटोवर संगीताची कमेंट पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही वाचा>> परिणीता चोप्रा-राघव चड्ढा यांची लगीनघाई! दिल्लीत सुरू आहे साखरपुड्याची जय्यत तयारी

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलं का? लंडनमधून घेतले आहेत अभिनयाचे धडे

संगीता बिजलानीच्या कमेंटनंतर चाहत्यांनी भाईजानच्या फोटोवर कमेंट्चा वर्षाव केला आहे. अनेकांनी संगीताच्या कमेंटवर रिप्लाय करत “वहिनी” असं लिहिलं आहे.

sangeeta bijlani on salman khan

तर एकाने “भाईजान अजूनही आवडतो का?” अशी कमेंट केली आहे.

sangeeta bijlani on salman khan

“लग्नाची तयारी” असं एकाने म्हटलं आहे.

sangeeta bijlani on salman khan

“तुम्ही अजूनपर्यंत वाट पाहत होतात, असं वाटतंय” असंही एकाने म्हटलं आहे. “लग्न करुन टाका” अशीही कमेंट केली आहे.

sangeeta bijlani on salman khan

“तुम्ही दोघं एकत्र छान दिसता”, अशी कमेंट केली आहे. “पहिल प्रेम” असंही एकाने म्हटलं आहे.

sangeeta bijlani on salman khan

सलमान खान व संगीता बिजलानी अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. परंतु, काही कारणांमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर संगीताने १९९६ साली मोहमद्द अजरुद्दीनबरोबर लग्नगाठ बांधली. २०१९मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. सलमान व संगीता आजही चांगले मित्र आहेत. संगीता बिजलानीच्या वाढदिवशी सलमानला तिच्याबरोबर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्या दोघांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या होत्या.