Sangeeta Bijlani : सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. ९० च्या दशकात त्याकाळातील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर त्याचं नाव जोडलं गेलं होतं. त्याची लव्ह लाइफ कायमच चर्चेत असायची. नुकताच भाईजानने त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा केला. पण, अद्याप तो लग्नबंधनात अडकलेला नाही. सलमान लग्न केव्हा करणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, याआधी भाईजानचं ठरलेलं लग्न मोडल्याची घटना घडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सलमान खानचे वडील सलीम खान यांनी देखील एका मुलाखतीत त्याचं लग्न संगीता बिजलानी हिच्याशी होणार होतं, दोघांच्या लग्नपत्रिका देखील छापल्या होत्या… याबद्दल वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे, ‘इंडियन आयडॉल १५’ मध्ये संगीता बिजलानीने नुकतीच विशेष पाहुणी म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी तिला सलमान खानबरोबरच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
१९८० मध्ये ‘मिस इंडिया’ ठरलेली अभिनेत्री संगीता बिजलानी ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, १९८६ पासून संगीता व सलमान जवळपास ८ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पत्रिका छापल्या गेल्या होत्या. ‘बॉलीवूड शादी’ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाची तारीख २७ मे १९९४ ठरवण्यात आली होती. पण, अचानक दोघांचं लग्न रद्द करण्यात आलं. यामुळे सिनेविश्वात सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
‘इंडियन आयडॉल १५’ मध्ये मानसी घोषने या स्पर्धक मुलीने, संगीताला याबद्दल प्रश्न विचारला, “आम्ही असं ऐकलंय की… तुमच्या आणि सलमान खान सरांच्या लग्नपत्रिका सुद्धा छापण्यात आल्या होत्या.” यावर अभिनेत्री म्हणाली, “हो…यात काहीच खोटं नाहीये.” विशाल ददलानीने याबद्दल पुढे विचारण्याचा प्रयत्न केला. पण, संगीताने याविषयी बोलणं टाळलं.
सलमान खान व संगीता बिजलानीचं लग्न का मोडलं?
सलमान आणि संगीता बिजलानी यांचं लग्न मोडण्यास अभिनेत्री सोमी अली कारणीभूत ठरली होती. याबद्दल स्वत: सोमी अलीने ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. उत्तर प्रदेशमध्ये एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संगीताने सोमी आणि सलमानला एकत्र पाहिलं होतं. यामुळे पुढे दोघांचं लग्न मोडलं आणि भाईजानने सोमीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण, कालांतराने सलमानच्या आयुष्यात ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या रायची एन्ट्री झाली आणि सोमी अली- सलमानचं सुद्धा ब्रेकअप झालं. काही वर्षांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संगीता बिजलानीची सोमीने माफी सुद्धा मागितली होती असंही तिने या मुलाखतीत सांगितलं होतं.