शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग प्रेक्षकांनी केलं आहे. या चित्रपटाच्या तिकिटांची विक्री जोरदार सुरू आहे. चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शाहरुखही भारावून गेला आहे.

‘पठाण’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलं आहे. सांगलीमधील एसआरके फॅनक्लबने ट्विटरद्वारे एक फोटो शेअर केला. या फोटोबरोबरच सांगलीतील तरुणांनी थिएटरचं बुक केलं असल्याचं सांगितलं आहे.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

सांगलीच्या या तरुणाला शाहरुखने ट्विटरद्वारे उत्तर दिलं आहे. शाहरुख म्हणाला, “धन्यवाद आणि आशा करतो की तुम्हाला हा चित्रपट आवडेल.” सांगलीच्या तरुणांनी संपूर्ण थिएटर बुक केल्यानंतर आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमरावतीमधील एसआरके फॅनक्लबने ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या या तरुणांनी थिएटर बुक करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Athiya Shetty-KL Rahul Wedding : पाहुणेमंडळींना ताटामध्ये नव्हे तर केळीच्या पानात वाढणार जेवण, लग्नात कोणत्या प्रकारचे पदार्थ असणार?

शाहरुख व दीपिकाचा हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणार अशी चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबरीने जॉन अब्राहमलाही या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. २५ जानेवारील बहुचर्चित ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

Story img Loader