अभिनेता वरुण धवनचा जीव एकदा भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झावर जडला होता. पण पहिल्या भेटीतच सानियाच्या आईने वरुणला फटकारलं होतं. खुद्द वरुणनेच सानियाशी पहिल्या भेटीचा खुलासा केलाय. त्याची सानियाशी पहिली भेट एका जाहिरातीच्या शुटिंगवेळी झाली होती आणि वरुणचं वागणं पाहून सानियाच्या आईला तो वेडा वाटला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्रिती सेनॉन आणि वरुण धवन सध्या त्यांच्या ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. ‘कर्ली टेल्स मिडल ईस्ट’शी क्रिती आणि वरुणनने गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी काही मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली. वरुणने त्याच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितलं. सानिया मिर्झाबरोबर एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी वरुणने मुकुल आनंदच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये इंटर्न असताना मदत केली होती. तेव्हा त्याचं पहिलं काम बुटांच्या ३०० जोड्या आणणं होतं. त्यावेळी सानियाने वरुणला तिच्यासाठी सफरचंद आणायला सांगितलं होतं. पण वरुणने सफरचंद आणल्यानंतर सानियाच्या आईने त्याला फटकारलं होतं

हेही वाचा – मुंबईतील प्रतिष्ठित मराठा मंदिरात ‘दृश्यम 2’ ची जादू; ‘अशी’ कामगिरी करणारा अनेक वर्षांतील पहिला बॉलिवूड चित्रपट

वरुण आठवण सांगत म्हणाला, “तिने (सानियाने) माझ्याकडे सफरचंद मागितले आणि मी तिच्यासाठी सफरचंद आणले. पण तिच्या आईला वाटलं की मी वेडा आहे. मी तिच्या आईला म्हणालो “आंटी… सफरचंद”. तेव्हा त्यांनी विचारलं की, “तुला हे सफरचंद आणायला कोणी सांगितलं होतं?” मी सानियाचं नाव सांगितलं. त्यावर तिची आई म्हणाली की, “माझी मुलगी सफरचंद खात नाही.” पण हे प्रकरण आणखी वाढण्याआधी सानिया तिथं आली आणि तिच्या आईला शांत केलं. तिनेच मला सफरचंद आणायला सांगितलं होतं, असं ती तिच्या आईला म्हणाली. त्या कामासाठी मला ५ हजार रुपये मिळाले होते.”

हेही वाचा – सोशल मीडिया स्टार राऊडी भाटी कार अपघातात ठार

दरम्यान, वरुण धवनने नुकतंच बॉलिवूडमध्ये एक दशक पूर्ण केलंय. त्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटामधून पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बदलापूर’, ‘एबीसीडी २’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘जुडवा २’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.