लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा दिवंगत दिग्गज अभिनेते सुनील दत्त व अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. आज (१ जून रोजी) नर्गिस यांच्या जयंतीनिमित्त संजय दत्तने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. संजयने दोन फोटो शेअर करत आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते, असं संजयने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नर्गिस दत्त या भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री होत्या. आपल्या अभिनयाने व सौंदर्याने त्यांनी चित्रपट चाहत्यांच्या मनांवर राज्य केलं. नर्गिस दत्त यांचा जन्म १ जून १९२९ रोजी झाला होता. आज त्यांची ९५ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा मुलगा व अभिनेता संजय दत्तने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Whose Hand on Rishabh Pant Shoulder Indian Cricketer Solved Mystery Behind 6 Years Old Viral Photo of 2019 World Cup
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात होता? ६ वर्ष जुन्या फोटोमागचं रहस्य अखेर उलगडलं, पंतने दिलं उत्तर
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या

चार वर्षांपूर्वी लष्करी अधिकाऱ्याशी प्रेमविवाह, अभिनेत्रीने पती व सासरच्या लोकांचे फोटो केले डिलीट, घटस्फोट घेणार?

“वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मा, मला तुझी रोज आठवण येते, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला, मला वाटतं की तू माझ्याबरोबर असतीस तर… तुला जसं वाटत होतं तसं आयुष्य मी जगत आहे आणि मला आशा आहे की मी तुला अभिमान वाटेल, असं काम केलं आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आई तुझी खूप आठवण येते,” असं कॅप्शन संजयने दिलं आहे. संजयने शेअर केलेल्या दोन फोटोंपैकी एक फोटो त्याचा व आई नर्गिस यांचा आहे. तर दुसरा फोटो फक्त नर्गिस यांचा आहे.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

संजय दत्तचं आईवर खूप प्रेम होतं. संजय अनेकदा भावुक पोस्ट शेअर करत असतो. मातृदिनानिमित्तही त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून भावुक पोस्ट लिहिली होती. नर्गिस दत्त यांच्या निधनाला आता ४३ वर्षे झाली आहेत. ३ मे १९८१ रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला होता.

आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…

संजय दत्त व नर्गिस यांची नम्रता यांनी सांगितलेली आठवण

संजय दत्तला प्रिया आणि नम्रता अशा दोन बहिणी आहेत. पहिले अपत्य असल्याने संजय दत्त आई नर्गिस यांच्या जवळचा होता. संजयदेखील आईवर जिवापाड प्रेम करायचा. लहानपणी आई नर्गिस संजय दत्तची प्रत्येक मागणी पूर्ण करायची. कधी कधी आई संजयवर चिडायची. त्याला ओरडायची. इतकच नव्हे तर आईने एक दिवस त्याच्या दिशेने चप्पल देखील भिरकावली होती. पण तिचे संजयवर तितकेच प्रेमही होते, अशी आठवण संजय दत्तची बहीण नम्रता यांनी एका पुस्तकात सांगितली आहे.

Story img Loader