आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते काहीही करण्यासाठी तयार होतात. कलाकारांना भेटता यावं, त्यांच्याबरोबर एक फोटो घेता यावा यासाठी मोठी धडपड करतात. काही चाहते तर कलाकारांना महागड्या भेटवस्तूसुद्धा गिफ्ट म्हणून देतात. तर काही चाहते आपल्या आवडत्या कलाकारावर इतकं प्रेम दाखवतात की, त्यांचं प्रेम पाहून अनेक जण चकित होतात. असंच काहीसं बॉलीवूड अभिनेता संजय दत्तबरोबरही घडलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय दत्तच्या आयुष्यातील एक जुना किस्सा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका चाहतीनं संजय दत्तसाठी तिच्याकडे असलेली कोटींची संपत्ती त्याच्या नावावर केली होती. चाहतीनं दिलेलं हे गिफ्ट पाहून त्यावेळी संजय दत्तसुद्धा चकित झाला होता.

एका चाहतीनं मृत्यूपूर्वी तिची सर्व संपत्ती अभिनेता संजय दत्तच्या नावे केली होती. २०१८ मध्ये संजय दत्तला पोलिसांचा अचानक फोन आला होता. त्यावेळी पोलिसांनी निशा पाटील, असं या चाहतीचं नाव सांगितलं होतं. तसेच पोलिसांनी त्यावेळी फोनवर पुढे सांगितलं होतं, “ही महिला तुझी चाहती आहे आणि तिनं तिची ७२ कोटींची संपत्ती तुझ्या नावावर केली आहे.” महिलेनं याबाबत बँकेलाही एक पत्र लिहिलं होतं. तसेच संपत्ती संजय दत्तच्या नावावर करण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात करा, असंही सांगितलं होतं.

संजय दत्तने पुढे काय केले?

चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. चाहतीनं संपत्ती नावावर केल्यानं संजय दत्तसुद्धा त्यावेळी थक्क झाला होता. त्यानं ही संपत्ती, तसेच अन्य मौल्यवान वस्तू महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात याव्यात, असं सांगितलं होतं. संजय दत्त म्हणाला होता, “मी या संपत्तीवर कोणताही दावा करणार नाही. कारण- मी निशाला ओळखतही नाही. त्यावर मी अधिक काही व्यक्त होऊ शकत नाही.”

संजय दत्तच्या वकिलांनीही त्यावेळी पुढे येत स्पष्ट केलं, “संजय दत्त या सामानावर आणि संपत्तीवर कोणताही दावा करणार नाही. तसेच कुटुंबातील अन्य व्यक्तींना या वस्तू, तसेच संपत्ती मिळावी यासाठी योग्य त्या कायदेशीर मदतीसाठी तो तयार आहे.” संजय दत्तच्या चाहतीचा हा किस्सा आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं बॉलीवूड गाजवल्यानंतर आता दाक्षिणात्य सिनेविश्वाकडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ व ‘लिओ’ या दोन्ही चित्रपटांनी संजय दत्तला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही मोठी पसंती मिळवून दिली आहे. सध्या संजय दत्त त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. लवकरच तो ‘केडी- द डेव्हिल’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.