चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणं हे अनेक तरुणींचं स्वप्न असतं. ८० च्या दशकात देव आनंद यांच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पणाची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती. एका अभिनेत्रीला ही संधी मिळाली होती, त्यानंतर तिने तिच्या करिअरमध्ये फक्त सात चित्रपट केले. मग एका आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्याशी लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या ९ वर्षांनी तिचं निधन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव रिचा शर्मा दत्त. १९७८ मध्ये देव आनंद त्यांचा ‘देस परदेस’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होता. हा चित्रपट पाहण्यासाठी रिचा तिच्या कुटुंबासह आली होती. यादरम्यान रिचाला देव आनंद यांना भेटण्याची संधी मिळाली आणि तिने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी रिचा अवघ्या १४ वर्षांची होती. देव आनंद यांनी तिला आधी तिचे शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. त्यांनी रिचाला आपला नंबर दिला आणि ते सतत तिच्या संपर्कात राहिले.

Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित

१९८५ मध्ये त्यांनी रिचाला ‘हम नौजवान’साठी साइन केले. यानंतर तिने १९८६ मध्ये ‘अनुभव’ आणि ‘इन्साफ की आवाज’मध्ये काम केले. १९८७ साली रिचाचे ‘सडक छप’ आणि ‘आग ही आग’ हे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. रिचा शर्मा तिची बहीण व देव आनंद यांची मुलगी अॅना आणि बंटी बहल यांच्याबरोबर सी रॉक हॉटेलमध्ये गेली होती. तेव्हा तिची व संजय दत्तची भेट झाली होती.

५६ वर्षीय अरबाज खानने केलं दुसरं लग्न, शुरा खानशी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाला…

१९८७ मध्ये रिचा शर्माने न्यूयॉर्कमध्ये संजय दत्तशी लग्न केले. त्यांना १९८८ मध्ये मुलगी झाली. तिचं नाव त्रिशला आहे. पण मुलीच्या जन्मानंतर संजय आणि रिचा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघेही वेगळे राहू लागले. संजय दत्तची तेव्हाच्या आघाडीच्या अभिनेत्रीशी वाढती जवळीक यामागे कारणीभूत होती, असं म्हटलं जायचं. त्यानंतर १० डिसेंबर १९९६ रोजी ब्रेन कॅन्सरने रिचा शर्माचे निधन झाले.

“मी कुठल्याही जातीचा असेन…”, मराठा आरक्षणावर नाना पाटेकरांचे रोखठोक मत; म्हणाले, “माझं सरकार ऐकणार…”

रिचाच्या निधनानंतर दोन वर्षांनी संजय दत्तने रिया पिल्लईशी दुसरं लग्न केलं. पण १० वर्षांनी २००८ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्याच वर्षी संजयने मान्यताशी तिसरं लग्न केलं. या लग्नापासून त्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt first wife richa sharma career films daughter trishala know details hrc