‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर, सगळेच शाहरुख खानच्या पुढच्या मोठ्या पडद्यावर रिलीज होणाऱ्या ‘जवान’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख आणि ऍटली हे दोघे प्रथमच एकत्र काम करत आहेत. ‘जवान’मध्ये नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही भूमिका आहेत. नुकतीच या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता या चित्रपटात संजय दत्तचा कॅमिओ पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘पीपिंग मून’च्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने या बातमीची पुष्टी केली आहे आणि म्हटले की, “या छोट्या परंतु महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड करणं अ‍ॅटलीसाठी खूप कठीण होते, कारण त्यासाठी एका मोठ्या सुपरस्टारची आवश्यकता होती. अल्लू अर्जुनला आधी या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते, पण ‘पुष्पा २’चं शूटिंग आणि तारखेच्या अडचणीमुळे त्याने यासाठी नकार दिला. अल्लूच्या नकारानंतर काही वेळातच निर्माते संजू बाबाकडे गेले आणि आता त्याने शाहरुखसाठी ही भूमिका करण्यास होकार दिला आहे.”

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

आणखी वाचा : राम चरण व ज्युनिअर एनटीआर ऐवजी ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकणार ‘ही’ हॉलिवूड डान्सर; पोस्ट करत दिली माहिती

संजय दत्त किंग खानच्या चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने ‘रा वन’ आणि ‘ओम शांती ओम’ एकत्र काम केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्याने केवळ भूमिका साकारण्यास होकार दिला नाही तर तो लवकरच मुंबईत शूटिंग सुरू करणार आहे. सध्या, संजय दत्त थलपथी विजय याच्या ‘लिओच्या’ मुख्य शूटिंगसाठी काश्मीरला रवाना झाला आहे. लवकरच संजय दत्त मुंबईच्या स्टुडिओमध्ये ‘जवान’च्या सीक्‍वेन्‍सचे शूटिंग करणार आहे. शिवाय, शाहरुख-संजयचा हा सीक्‍वेन्‍स शूट करण्‍यासाठी भव्य सेट उभारले जाणार असल्याचंही म्हंटलं जात आहे.

‘पठाण’च्या घवघवीत यशानंतर शाहरुखच्या चाहत्यांचे डोळे त्याच्या पुढील चित्रपटाकडे लागले आहेत. ‘जवान’बरोबर शाहरुख खानचा ‘डंकी’ हा आगामी चित्रपटसुद्धा चर्चेत आहे. ‘जवान’मधील शाहरुखचा लूक लोकांच्या पसंतीस पडला आहे, शिवाय संजय दत्तसह दीपिका पदूकोणही यामध्ये कॅमिओ करणार असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

Story img Loader