प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘खलनायक’ याला नुकतीच ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्तने साकारलेली खलनायकाची भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटामुळे संजय दत्तला इंडस्ट्रीत वेगळी ओळख मिळाली. माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनीही या चित्रपटात उत्कृष्ट काम केले होते. चित्रपटातील सर्वच पात्रांचे खूप कौतुक झाले. या चित्रपटातील ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यालाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील हे आयकॉनिक गाणे आजही लोकांच्या मनात घर करून आहे.
हेही वाचा- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप? अभिनेत्रीने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण
आता तब्बल ३० वर्षांनंतर अभिनेता संजय दत्त याने या गाण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. . नुकताच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खलनायकला ३० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यात संजय दत्तने घागरा चोली घातली होती या कार्यक्रमादरम्यान संजू बाबाने या गाण्यात त्याला घागरा चोली का घालावी लागली याबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- “सुरुवातीला मला खूप विचित्र वाटत होतं…”; विकी कौशलचा पत्नी कतरिनाबाबत मोठा खुलासा, म्हणाला
संजय दत्त म्हणला, “सेटवर आल्यावर मी दुसरे कपडे घातले होते. तेवढ्यात सुभाष घई आले आणि त्यांनी मला घागरा-चोली घालायला सांगितल. मी आश्चर्यचकित झालो. मी त्यांना म्हणालो सर तुम्ही काय करत आहात. ते म्हणाला तू घाघरा-चोली घालून ये. मी म्हणालो का घालू. ते म्हणाला कारण तू चोलीच्या मागे असशील.”
या गाण्यावरून बराच वाद झाला होता. लोक या गाण्याला अश्लील म्हणत होते. हा मुद्दा इतका वाढला होता की दूरदर्शन आणि विविध भारतीने या गाण्यावर बंदी घातली होती. गाण्यात माधुरी दीक्षित आणि नीना गुप्ता यांनी अप्रतिम डान्स केला होता.