सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट, बायोपिक आणि रिमेक हे तीन प्रकारचे चित्रपटच बनत आहेत. रिमेकच्या बाबतीत बघायला गेलं तर बॉलिवूड स्वतःच्याच चांगल्या चित्रपटांचेही रिमेक करू लागलं आहे. याच बाबतीत अभिनेता संजय दत्त याने भाष्य केलं आहे. त्याच्या ‘खलनायक’चित्रपटाच्या रिमेकमध्ये त्याला कोणत्या अभिनेत्याने काम करू नये याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. इतकंच नाही तर संजय दत्तने रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरही कटाक्ष केला आहे.

Amazon मिनी टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘केस तो बनता है’ या कार्यक्रमात वेगवेगळे बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि त्यांच्यावर मजेशीर आरोप केले जातात. हा एक कॉमेडी शो आहे आणि रितेश देशमुख या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. याच कार्यक्रमाच्या नवीन भागात अभिनेता संजय दत्त याने हजेरी लावली आणि त्याच्याही या कार्यक्रमात धमाल मजामस्ती करण्यात आली.

आणखी वाचा : १४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण, हॉलिवूड स्टार केविन स्पेसी यांची निर्दोष मुक्तता; नेमकं प्रकरण काय?

याच कार्यक्रमात रितेशने संजयला विचित्र प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता की ‘खलनायक’च्या रिमेकमध्ये कोणत्या अभिनेत्याने काम करू नये? यासाठी तीन पर्यायदेखील देण्यात आले रणवीर सिंग, विकी कौशल, रणबीर कपूर. यावर संजय दत्तने रणवीर सिंगचं नाव घेत त्याने या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करू नये असं स्पष्ट केलं.

याच संदर्भात बोलताना संजय दत्त म्हणाला, “या चित्रपटाच्या रिमेकमध्ये रणवीरने काम करू नये कारण माझ्या असं कानावर आलं आहे की सध्या तो कपडे घालत नाही.” रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरुन संजय दत्तने त्याला चांगलाच टोमणा मारला आहे. रणवीरवर या संदर्भात पोलिसांत तक्रार देखील करण्यात आली होती. संजय दत्त हा नुकताच ‘शमशेरा’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटात झळकला होता. आता संजय दत्त ‘केडी – अ डेविल’ या कन्नड चित्रपटासाठी तयारी करत आहे.

Story img Loader