संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लईचा आज वाढदिवस आहे. ती तुरुंगात कैद असलेल्या संजय दत्तला भेटायला जायची. याच भेटीगाठीदरम्यान दोघेही तुरुंगात एकमेकांच्या प्रेमात पडले आणि संजय तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लग्न केलं होतं. आज या दोघांची प्रेम कहाणी व रियाच्या आयुष्यातील काही किस्से आपण जाणून घेऊयात.

हेही वाचा – चार वर्षात मोडला प्रेम विवाह, घटस्फोटानंतर होती नैराश्यात, आता अभिनेत्रीला ३७ व्या वर्षी करायचंय दुसरं लग्न; म्हणाली…

Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
Flag hoisting held on January 26 on islands and forts of Konkan
कोकणातील निर्मनुष्य बेटे आणि किल्ल्यांवर २६ जानेवारीला ध्वजारोहण होणार

रिया पिल्लईचा जन्म २७ जून १९६५ रोजी लंडनमध्ये झाला होता. हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची ती नात आहे. संजय दत्तच्या आयुष्यात येण्यापूर्वीच रियाचे लग्न झाले होते. तिने १९८४ मध्ये मायकेल वाझशी लग्न केले होते, परंतु १० वर्षांनी १९९४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रियाने नंतर एअरहोस्टेस म्हणून काम करायला सुरुवात केली. यासोबतच तिने मॉडेलिंगही सुरू केलं. त्यादरम्यान तिची संजय दत्तशी मैत्री झाली, मात्र मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त तुरुंगात गेला. ती संजयला भेटण्यासाठी अनेकदा तुरुंगात जात असे. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. संजय दत्त तुरुंगातून सुटल्यावर त्याने रियाला प्रपोज केले आणि दोघांनी साई मंदिरात लग्न केले.

अभिनय सोडून केलं लग्न, गरोदर असतानाच झाला घटस्फोट, आता गोविंदाच्या भाचीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; कोण आहे तिचा पती?

लग्नानंतर संजय दत्त शूटिंगमध्ये व्यग्र झाला, त्यामुळे तो रियाला वेळ देऊ शकत नव्हता. अशातच दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. परिणामी रियाचे नाव लिएंडर पेसशी जोडले गेले आणि संजयच्या आयुष्यात डान्सर नादिया दुर्राणीची एंट्री झाली. नंतर अवघ्या काही वर्षातच ते वेगळे झाले आणि २००८ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला.

संजय दत्तपासून घटस्फोट घेतल्यानंतर रिया पिल्लई टेनिसपटू लिएंडर पेससोबत राहू लागली. दोघांना एक मुलगी अयाना झाली. मात्र, काही काळानंतर या नात्यातही दुरावा निर्माण झाला आणि रियाने लिएंडर पेसवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी लिएंडरने न्यायालयात सांगितलं की त्याने रियाशी कधीही लग्न केलं नाही. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तर, रियाने लिएंडरवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. सध्या रिया एकटीच मुलीचा सांभाळ करत आहे.

Story img Loader