बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये अधीरा ही भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली, त्यानंतर आता तो तमिळमधील ‘थालापथी ६७’ आणि कन्नडमधील ‘केडी द डेव्हिल’ मध्ये दिसणार आहे. अलिकडेच ‘केडी द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचा हिंदीत टीझर प्रदर्शित झाला, या कार्यक्रमात संजय दत्तने पुन्हा एकदा बॉलिवूड आणि दक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर वक्तव्य केलं. यावेळी त्याने आगामी काळात तो अधिकाधिक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार आहे असं वक्तव्य केलं. त्याचबरोबर आजच्या काळात बॉलिवूडने दक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडून काय शिकलं पाहिजे हेही सांगितलं.

नुकतंच एका कार्यक्रमात संजय दत्त म्हणाला, “मी केजीएफमध्ये काम केलं आणि आता मी दिग्दर्शक प्रेम यांच्यासह ‘केडी द डेव्हिल’मध्ये काम करत आहे. पण आता मला वाटतंय की मी आता अधिकाधिक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार आहे. मी ‘केजीएफ’मध्ये आणि एसएस राजामौलीसोबत काम केले आहे. मी पाहिले की येथे खूप उत्कटतेने आणि प्रेमाने चित्रपट बनवले जातात, त्यामुळे मला वाटतं की बॉलिवूडनं हे सर्व विसरू नये. बॉलिवूडने आपली मुळं कधीही विसरता कामा नये.”

आणखी वाचा- ‘खलनायक’चा रिमेक रणवीर सिंगने करू नये; संजय दत्तने सांगितलं यामागील कारण

संजय दत्त हा बॉलिवूडचा हिट अभिनेता आहे पण त्याने खलनायकी भूमिका साकारूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. संजय दत्त अखेर रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. या चित्रपटात वाणी कपूरही होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता पण या चित्रपटातही संजय दत्तच्या कामाचं कौतुक केलं गेलं होतं.

आणखी वाचा- मोडलं होतं करिश्मा- अभिषेकचं ठरलेलं लग्न, आता ऐश्वर्यासह फोटो शेअर करत म्हणाली…

‘केडी द डेव्हिल’ या चित्रपटाविषयी बोलायचं तर, या चित्रपटात अभिनेता ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा १९७० च्या दशकातील आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. पुढील वर्षी हा चित्रपट कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader