करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्या तीन दिवसांमध्येच चित्रपटाने ४५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘रॉकी और रानी…’ मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : “प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट…”, बॉलीवूड पीआरबद्दल नोरा फतेहीने केला मोठा खुलासा; म्हणाली, “कोणाचेही न ऐकता…”

Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
kiran rao
ऑस्करमध्ये भारतीय महिलांचा जलवा; किरण रावच नव्हे, तर ‘या’ महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांनाही मिळाली होती एन्ट्री
laapata ladies for oscars
ऑस्करसाठी चित्रपटांची निवड नेमकी कशी होते? ‘FFI’ काय आहे?
Music release of the movie Naad in the presence of Prasad Oak
प्रसाद ओकच्या उपस्थितीत ‘नाद’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन
kareena kappor saif ali khan omkara
स्वतःचा अभिनय दाखवायला करीना कपूरने ठेवलेला चित्रपटाचा खास शो, पण घडलं उलट; किस्सा सांगत म्हणाली…
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
allegations on Arindam Sil
दिग्दर्शकानं मांडीवर बसवून बळजबरी किस केलं; अभिनेत्रीचा आरोप

करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. याच दरम्यान, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांनीही करणच्या चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. संजय जाधव यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये, “खूप भारी…करण जोहर सर! तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे… प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा चित्रपट.” असे म्हटले आहे.

हेही वाचा : “…आणि शूटिंगला सुरुवात झाली”, प्राजक्ता माळीने शेअर केला हास्यजत्रेच्या सेटवरचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “आतुरतेने वाट…”

दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासह अभिनेता हेमंत ढोमे, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री अमृता खानविलकर या मराठी कलाकारांनीही ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. अमृताने चित्रपटातील ‘व्हॉट झुमका…’ या गाण्यावर व्हिडीओ बनवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा : राहुल महाजनचं तिसरं लग्नही मोडणार? पत्नीला घटस्फोट देण्याच्या चर्चांवर म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शनाची जबाबादारी सांभाळली होती. चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल असा अंदाज चित्रपट समीक्षकांसह रणवीर-आलियाच्या चाहत्यांनी वर्तवला आहे.