बॉलीवूड अभिनेता संजय कपूर हा अनिल कपूर व बोनी कपूर यांचा भाऊ आहे. संजयने भावांबरोबर त्याचं नातं कसं आहे, याबाबत खुलासा केला आहे. आपल्या करिअरमध्ये संजयने खूप सिनेमे केले, पण त्याला भाऊ अनिल इतकं यश मिळालं नाही. अनिल आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असला तरी मी आयुष्यात जास्त समाधानी आहे, असं विधान संजयने केलं आहे.
शिवानी पौला दिलेल्या मुलाखतीत संजयने भावंडांमधील तुलनेबद्दल भाष्य केलं. सिनेसृष्टीत ही तुलना स्पष्ट दिसत असते, पण कालांतराने ती कमी होत जाते, असं संजय म्हणतो. अशा तुलनेचा त्याच्या भावांसोबतच्या नात्यांवर अजिबात परिणाम होत नाही कारण त्याची सुरुवात आपण केली नव्हती, असंही संजय म्हणाला.
हेही वाचा – “मला त्याबद्दल शून्य इंटरेस्ट…”, सुबोध भावे ‘त्या’ प्रश्नावर स्पष्टच बोलला; अभिनेत्याने पुण्यात केलं मतदान
संजय कपूर म्हणाला, “आम्ही एकत्र राहत होतो. जेव्हा आम्ही करिअरची सुरुवात केली तेव्हा आम्ही दोन बेडरूमच्या घरात राहत होतो. आम्ही कुटुंब म्हणून एकमेकांच्या खूप जवळ आहोत. अर्थात, मग तुमची स्वतःची मुलं होतात, वगैरे गोष्टी आल्याच. बऱ्याचदा असंही होतं की मी अनिल व बोनी यांना महिना किंवा दीड महिना भेटत नाही. पण आम्ही एकमेकांचा आदर करतो, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि हा चित्रपट निर्मितीचा एक भाग आहे हे समजण्याइतके समजुतदार आम्ही आहोत.”
‘श्रीकांत’ची दमदार कमाई सुरूच, राजकुमार रावच्या चित्रपटाने चार दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी
संजयने त्यांच्या कुटुंबाच्या घट्ट नात्याचं श्रेय आई-वडिलांना दिलं. त्यांनीच मुलांमध्ये समानता आणि एकतेची भावना निर्माण केली, असंही संजयने सांगितलं. यावेळी त्याने भावांमधील स्पर्धेबाबतही भाष्य केलं. “माझे पुतणे, पुतण्या आहेत, कधीकधी त्यांचे चित्रपट हिट होतात, कधीकधी त्यांना अपयश येतं, पण अर्जुन, सोनम किंवा जान्हवी किंवा कोणाच्याही चित्रपटाच्या रिलीजच्या शुक्रवारनुसार आमची नाती बदलत नाही,” असं संजय कपूरने स्पष्ट केलं.
“मी असं म्हणत नाही की स्पर्धा नाही. अनिल माझ्यापेक्षा जास्त यशस्वी असला तरी मी त्याच्यापेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी आहे, असं मला नेहमी वाटतं. मी नेहमी म्हणतो की देव दयाळू आहे. जरी मी त्याच्यापेक्षा आयुष्यात कमी मिळवलं असलं तरीही मला वाटतं की मी खूप आनंदी आहे. मी नेहमी चांगल्या मूडमध्ये असतो. मी असं म्हणत नाही की तो दु: खी आहे किंवा इतर काही. ते नेमकं कसं सांगावं हे मला कळत नाहीये, पण मला वाटतं की मी त्याच्यापेक्षा जास्त समाधानी आहे,” असं संजय कपूर म्हणाला.
Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर
संजय कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘मर्डर मुबारक’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यात सारा अली खान, विजय वर्मा, पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.