बॉलीवूडमधील आघाडीचे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव आणि स्टारकास्ट ठरली आहे. बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीचे लोकप्रिय तीन कलाकार या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरण आदर्श यांनी या चित्रपटाबद्दल माहिती शेअर केली आहे. संजय लीला भन्साळींच्या पुढच्या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिका साकारतील. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अँड वॉर’ असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमला म्हणजेच २०२५ मध्ये डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होईल.

आर्यन खान विद्यार्थी म्हणून कसा होता? USC तील डीन आणि प्राध्यापिकेने केला खुलासा; म्हणाल्या, “त्याच्या वडिलांनी…”

या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चाहते आनंद व्यक्त करत आहेत. रणबीर कपूर, त्याची पत्नी व सध्याची आघाडीची बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा विकी कौशल हे तिघेही एकत्र या चित्रपटात दिसतील. या तिघांना मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असेल.

“माझ्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप शो शाहरुख खानसह होता”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “ते अत्यंत…”

दरम्यान, रणबीर कपूर सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. २०२३ सरताना त्याने बॉलीवूडला एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. तर, विकी कौशलने ‘सॅम बहादूर’ सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर २०२३ मध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay leela bhansali announces love and war film with ranbir kapoor alia bhatt vicky kaushal hrc