Santosh Juvekar post about Chhaava : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा जलवा पाहायला मिळत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने दोन दिवसांत दमदार कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना यांच्याबरोबरच प्रेक्षक चित्रपटातील कलाकारांचे कौतुक करताना थकत नाहीयेत. ‘छावा’मध्ये मराठी कलाकारांनी साकारलेल्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या आहेत.

संतोष जुवेकरने ‘छावा’मध्ये रायाजी हे पात्र साकारले आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. अशातच संतोषच्या एका पोस्टने लक्ष वेधले आहे. संतोषने ‘छावा’च्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे शेअर करत एक पोस्ट केली आहे. संतोषच्या पोस्टमध्ये चित्रपटाने दोन दिवसांत भारतात ७२.४ कोटी कमावल्याचं लिहिलं आहे.

संतोष जुवेकरची पोस्ट

“मला या आकड्यांपेक्षा प्रत्येक सिनेमागृहातल्या माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आकडा बघायला आणि ऎकायला आवडेल.
माझ्या धाकल्या धनिना बघायला आणि समजून घ्यायला येणाऱ्या माझ्या भगव्या रक्ताचा कल्लोळ झाला पाहिजे ? जय भवानी जय शिवराय जय संभाजी राजे”, असं कॅप्शन संतोषने या पोस्टबरोबर लिहिलं आहे.

संतोषच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘उत्कृष्ट अभिनय केला भाऊ. जगदंब….जगदंब….जगदंब’, ‘संतोष दादा तुम्ही या सिनेमाचा भाग आहात हे देखील खूप महत्त्वाचे आहे’, ‘तू चित्रपटात आहेस हीच आम्हाला भाग्याची आणि गौरवाची गोष्ट आहे,’ ‘अभिमानास्पद दादा’ अशा कमेंट्स संतोषच्या या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. चित्रपटात विकीचा अभिनय दमदार असून क्लायमॅक्स पाहताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, असंही काही युजर्सनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

‘छावा’ चित्रपटात ‘छावा’मध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहीत पाठक हे कलाकार आहेत.

Story img Loader